"विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासात शाळेबरोबरच पालकांचेही योगदान आवश्यक : एम. डी दडस सर
दहिवडी : विद्यार्थी व्यक्तिमत्त्वामध्ये विकासासाठी शाळेबरोबरच पालकांचेही योगदान आवश्यक आहे अशा प्रकारचे प्रतिपादन कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीचे संचालक श्री एमडी दडस सर यांनी काढले श्री बिरदेव बालक व प्राथमिक विद्यालय दहिवडी या ठिकाणी आयोजित विविध स्पर्धा परीक्षेतील यशवंत-गुणवंत विद्यार्थी सत्कार सन्मान सोहळा व पालक प्रबोधन मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शाळेचे प्रमुख श्री दादासाहेब दडस मुख्याध्यापिका कोरडे मॅडम व नगरसेविका मोनिकाताई गुंडगे, सदस्य श्री अमृत चौगुले, सदस्या शिंदे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेतील विविध विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल गुणवंतांचे सत्कार करण्यात आले यावेळी शेकडो पालक उपस्थित होते पालकांनाही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले तसेच चिरंजीव प्रज्वल दडस याने आयआयटी प्रवेश मिळवल्याबद्दल त्याचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रज्वल याने आपला शिक्षणाचा जीवन प्रवास सर्व विद्यार्थी व पालक यांच्यासमोर उलगडला. सूत्रसंचलन सौ. सुषमा सावंत- पवार यांनी केले व आभार लालासो खरात यांनी मानले.
No comments:
Post a Comment