महादेव जानकरांनी सिद्धरामय्या प्रमाणे दोन मतदार क्षेत्रात दंड थोपटले..?
छायाचित्र: बंगळुरू येथील कार्यक्रमात एकाच मंचावर असताना महादेव जानकर यांच्या समवेत सिध्दरामय्या (संग्रहित) |
नवी दिल्ली : काही दिवसांतच लोकसभा निवडणुका आचारसंहिता जाहीर होईल. जो तो पक्ष आपआपल्या परीने निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. नुकतेच ज्येष्ठ नेते शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांच्या उमेदवारी'स पाठिंबा देवून, त्यांना इंडिया आघाडीत सामील होण्याचे तसे निमंत्रण दिले आहे. पण रासप महाआघाडीत जाण्यासाठी अजून काही जागेवर ठाम असल्याचे कळत आहे. 'रासप'ला परभणी, नगर, ईशान्य मुंबई आणि सांगली लोकसभा मतदार संघाची जागा हवी आहे. या पाचही मतदारसंघात रासपचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे संघटनात्मक कामही येथे चांगले आहे. मराठवाड्यातील परभणी लोकसभा मतदार क्षेत्रात गंगाखेडला रासपचे विद्यामान आमदार आहेत.
पण रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर हे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या प्रमाणे जाताना दिसत आहेत. महादेव जानकर यांनी खुप दिवसांपासूनच दोन लोकसभा मतदार क्षेत्रात उमेदवारी करणार असल्याचे वेळोवेळी जाहीर केले आहे. शेजारच्या कर्नाटक राज्यातील मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे स्वतः धनगर/कुरबा या मागासवर्गीय (ओबीसी) समूह वर्गातून येतात. सन 2018 मध्ये सिद्धरामय्या यांनी बदामी आणि चामुंडेश्वरी या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी दाखल केली होती. पुढे ते बदामी मतदारसंघातून निवडूनही आले. अवघ्या काही हजाराच्या मताने तेथे ते निवडून आले होते. वास्तविकता याच बदामी विधानसभा मतदारसंघात महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवाराकडे तुल्यबळ उमेदवार म्हणून पाहिले जात होते. राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक विधानसभेत खाते उघडेल, अशी चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे बदामीत रासप'ने अनेक वर्षापासून मोर्चेबांधणी केली होती, अनेक कार्यक्रम राबवले होते, रासपच्या सभा आयोजित केल्या होत्या. संपूर्ण बदामी मतदार क्षेत्रात स्थानिक नागरिकांचा प्रतिसादही मोठ्या प्रमाणात रासप'ला मिळताना दिसत होता. पण अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्यावेळी सिद्धरामय्या यांनी अनपेक्षितपणे बदामी या मतदारसंघातूनही उभे राहण्याचे ठरविले. त्यावेळी पुढे रासपच्या उमेदवाराने तेथे माघार घेतली. जर रासपचे उमेदवाराने निवडणुकीच्या आखाड्यात लढत दिली असती, तर सिद्धरामय्याना कदाचित येथून पराभवास सामोरे जावे लागले असते. अटीतटीच्या लढतीत केवळ हजार मताच्या फरकाने सिद्धरामय्या निवडून आले होते. कर्नाटकातील धनगर समाजाच्या काही कार्यक्रमात सिद्धरामय्या व महादेव जानकर हे यापूर्वी एकाच मंचकावर येताना अनेकवेळा एकत्र दिसलेले आहेत.
असो, हे सर्व चर्चा करण्याचे कारण की राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे आता सिध्दरामय्या यांच्याप्रमाणे परभणी व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार आहेत. तशी या दोन्ही लोकसभा मतदासंघातील त्यांच्या समर्थकांचे म्हणणे सातत्याने समोर येत आहे व तसे जानकर यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नही जोरदारपणे होताना दिसत आहेत.
रासपच्या बदामीतील राजकीय जीवदानामुळे सिद्धरामय्या विजयी झाले आणि पुढे कर्नाटकचे मुख्यमंत्रीही झाले. आता महादेव जानकर हे कोणत्या लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून संसदेत जाणार आहेत, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
निधर्मी जनता दलातून बाहेर पडलेल्या सिद्धरामय्या यांनी स्वतःचा पक्षही काढला होता. एकाच निवडणुकीचा अनुभव घेऊन त्यांनी काँग्रेससोबत घरोबा केला. त्यांनी काँगेसच्या पाठीशी जनमत उभ करून काँग्रेसला उभारी दिली. दोनवेळा मुख्यमंत्रीपद भूषवले. महादेव जानकर मात्र स्वतःचा पक्ष, झेंडा, अजेंडा ठेवून देश व राज्याच्या राजकारणात संघर्ष करताना दिसत आहे. मराठा, ओबीसी, दलित, मुस्लिम या समूहातून महादेव जानकर यांच्या उमेदवारीस, राष्ट्रीय समाज पक्षास पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यांना आगामी काळात कितपत यश मिळेल हा येणारा काळच ठरवेल.
धन्यवाद. वरील माहिती आपण उपलब्ध करून दिल्याबद्दल.
ReplyDelete