Tuesday, March 19, 2024

तमिळनाडूत ६ जागांवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार तयार

तमिळनाडूत ६ जागांवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार तयार 

| मुंबई : (१८/०३/२४) 

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष तामिळनाडू राज्यात लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. जास्तीत जास्त जागा राष्ट्रीय समाज पक्ष लढवणार आहे. आतापर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाने सहा लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष बांधणी केली आहे. रणागंणात लढण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार ही तयार आहेत. लवकरच राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवारांची यादी मुंबई येथील केंद्रीय कार्यालयाकडून जाहीर करण्यात येईल, अशी माहिती रासपचे राष्ट्रीय सचिव एम.जी माणीशंकर यांनी 'यशवंत नायक'शी बोलताना दिली.

तमिळनाडू राज्याच्या प्रदेशअध्यक्ष पदावरून के सेल्वम यांना हटवून रासपने जी. राजा यांची नियुक्ती केली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष दक्षिण भारततात आपले अस्तित्व सिद्ध करेल, असा विश्वास रासपचे राष्ट्रीय महासचिव के. प्रसन्नाकुमार यांनी यशवंत नायकशी बोलताना व्यक्त केला.






Tuesday, March 12, 2024

यशवंत नायक : फेब्रुवारी 2024

यशवंत नायक : फेब्रुवारी 2024




*यशवंत नायक – फेब्रुवारी 2024*
वाचक मित्रानो, 🙏

या अंकात काय वाचाल...

रासप मुखपत्राचे विचारधन 
पान १
*कुळ कुलीन का म्हणून मिरवतो! मुळ कुळाचे कोणी का जाणतो : संत कनकदास*

पान -२
*संत संगाचा आनंद मिळता, तीर्थक्षेत्राची भटकंती कशाला! सत्यबोध झाले मनाला, दु:ख कशाचे असेल तयाला : संत कनकदास*

पान -३
*हा- तो माझे हित करील, यावर विसंबून राहू नको! पित्यावर विसंबून राहिला, प्रल्हाद ही फसला : संत कनकदास*

मुख्य ठळक घडामोडी, मुख्य बातम्या

पान क्र. १
@ *नंदगड - कर्नाटक :*  संगोळी रायण्णा जयंती संसदेत साजरी व्हावी : महादेव जानकर

> राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायण्णा राज्याभिषेक वार्षिकोत्सव 

> रासपच्या चळवळीमुळे प्रस्थापित सरकारला नंदगड क्रांतिक्षेत्राचा विकास करणे भाग पडले

@ *बेळगावी - कर्नाटक :* देशातील  काँग्रेस आणि भाजपची मक्तेदारी मोडीत काढणे, हाच रासपचा अजेंडा

> पत्रकार परिषदेत रासप संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांची घोषणा

पान क्र २
@ *बारामती :* बारामती लोकसभा क्षेत्रात रासप स्वतंत्र लढणार 

> बारामतीत रासपची बैठक, उमेदवार एकमताने देणार

@ *नागपूर :* रासप हायकमांड समवेत विदर्भ रासपा पदाधिकारी यांची बैठक

@ *प्रयागराज - उत्तर प्रदेश :* प्रयागराज येथे रासपाची समीक्षा बैठक

@ *अहमदनगर :* भाजप, काँग्रेसने देशाची वाट लावली : महादेव जानकर

> अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून रासपचे रवींद्र कोठारी लढणार

@ *मधेपुरा- बिहार :* रासपची मधेपुरा व सहरसा लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी

@ *जौनपुर - उत्तर प्रदेश :* जौनपूर लोकसभा मतदारक्षेत्रात रासपची समीक्षा बैठक

@ *चरखी दादरी - हरियाणा :* राष्ट्रीय समाज पक्ष हरियाणा प्रदेश अध्यक्षपदी श्री. भगवान यांची नियुक्ती

> रासप हरियाणा राज्याची कार्यकारणी गठित

पान क्र. ३ 

@ *मुंबई :* मुस्लिम आणि ओबीसी समाजाने मतपेटीचा व्यवहार करावा : महादेव जानकर

> भुजबळ, जानकर, पाटील यांच्या हस्ते मंडलनामा पुस्तकाचे प्रकाशन

@ *हावेरी - कर्नाटक :* कागीनेली धर्मपिठास महादेव जानकर यांनी दिली भेट

@ *दिल्ली :* दिल्लीतील सातही लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज आखाड्यात उतरणार

@ *मधुबनी - बिहार :* बिहारमध्ये प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे संघटन : गोपाल पाठक

> रासपमुळे राजकारणात आलो : रोहीत शर्मा, जिल्हाध्यक्ष मधुबनी रासप 

@ *धारवाड - कर्नाटक :* संगोळी रायण्णा जन्मक्षेत्रास महादेव जानकर यांची भेट

@ *सोलापूर :* नवरदेवाने दिल्या रासपच्या घोषणा; महादेव जानकर यांचे वधू वरांस शुभेच्या

@ *बेळगांव - कर्नाटक :* अक्कीसागर यांच्या निवासस्थानी महादेव जानकर यांची भेट

> मेरा घर : मेरा झेंडा - एस एल अक्कीसागर - महादेव जानकर 

@ *सातारा :* रासप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांचे फोटो समाज माध्यमात ठरले लोकप्रिय

पान क्र. ४

@ *बेळगावी - कर्नाटक :* रासप राष्ट्रीय कार्यकारणी व कर्नाटक राज्य कार्यकारणी बैठक उत्साहात

> कर्नाटक महाराष्ट्र उत्तर प्रदेश सहित देशात जास्तीत जास्त जागा राष्ट्रीय समाज पक्ष लढवणार ! : महादेव जानकर

> जनमताचा अनादर करणाऱ्या जनतंत्र विरोधी सत्ताधार्‍यांचा बुरखा फाडून रासपाचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणनार

> हे वर्ष निवडणुकीचे वर्ष असल्याने रासप हितचिंतक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी रात्रीचाही दिवस करून काम करावे : रासप सुप्रीमो

@ *कन्नौज - उत्तर प्रदेश :* रासपच्या जन स्वराज यात्रेत शेकडो गाड्यांचा ताफा;  कन्नौज शहर बनले रासपमय 

@ *बीड :* भुजबळ साहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हा : महादेव जानकर यांचे आवाहन

@ *शिवपुरी - मध्य प्रदेश* : लोकसभा निवडणुकीपूर्वी बूथपर्यंत संघटन मजबूत करावे : महादेव जानकर

> शिवपुरी लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज यात्रा 

*यशवंत नायक वाचा म्हणजे वाचाल*

*यशवंत नायक आपला खरा आणि प्रथम प्रतिनिधि आहे*

*यशवंत नायक आपला राष्ट्र आणि समाज प्रतिनिधि आहे...*

_सिद्ध - सागर

कार्यकारी संपादक

Saturday, March 9, 2024

महादेव जानकरांनी सिद्धरामय्या प्रमाणे दोन मतदार क्षेत्रात दंड थोपटले..?

महादेव जानकरांनी सिद्धरामय्या प्रमाणे दोन मतदार क्षेत्रात दंड थोपटले..?

छायाचित्र: बंगळुरू येथील कार्यक्रमात एकाच मंचावर असताना महादेव जानकर यांच्या समवेत सिध्दरामय्या (संग्रहित)

नवी दिल्ली : काही दिवसांतच लोकसभा निवडणुका आचारसंहिता जाहीर होईल. जो तो पक्ष आपआपल्या परीने निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. नुकतेच ज्येष्ठ नेते शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांच्या उमेदवारी'स पाठिंबा देवून, त्यांना इंडिया आघाडीत सामील होण्याचे तसे निमंत्रण दिले आहे. पण रासप महाआघाडीत जाण्यासाठी अजून काही जागेवर ठाम असल्याचे कळत आहे. 'रासप'ला परभणी, नगर, ईशान्य मुंबई आणि सांगली लोकसभा मतदार संघाची जागा हवी आहे. या पाचही मतदारसंघात रासपचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे संघटनात्मक कामही येथे चांगले आहे. मराठवाड्यातील परभणी लोकसभा मतदार क्षेत्रात गंगाखेडला रासपचे विद्यामान आमदार आहेत. 

पण रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर हे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या प्रमाणे जाताना दिसत आहेत. महादेव जानकर यांनी खुप दिवसांपासूनच दोन लोकसभा मतदार क्षेत्रात उमेदवारी करणार असल्याचे वेळोवेळी जाहीर केले आहे. शेजारच्या कर्नाटक राज्यातील मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे स्वतः धनगर/कुरबा या मागासवर्गीय (ओबीसी) समूह वर्गातून येतात. सन 2018 मध्ये सिद्धरामय्या यांनी बदामी आणि चामुंडेश्‍वरी या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी दाखल केली होती. पुढे ते बदामी मतदारसंघातून निवडूनही आले. अवघ्या काही हजाराच्या मताने तेथे ते निवडून आले होते. वास्तविकता याच बदामी विधानसभा मतदारसंघात महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवाराकडे तुल्यबळ उमेदवार म्हणून पाहिले जात होते. राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक विधानसभेत खाते उघडेल, अशी चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे बदामीत रासप'ने अनेक वर्षापासून मोर्चेबांधणी केली होती, अनेक कार्यक्रम राबवले होते, रासपच्या सभा आयोजित केल्या होत्या. संपूर्ण बदामी मतदार क्षेत्रात स्थानिक नागरिकांचा प्रतिसादही मोठ्या प्रमाणात रासप'ला मिळताना दिसत होता. पण अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्यावेळी सिद्धरामय्या यांनी अनपेक्षितपणे बदामी या मतदारसंघातूनही उभे राहण्याचे ठरविले. त्यावेळी पुढे रासपच्या उमेदवाराने तेथे माघार घेतली. जर रासपचे उमेदवाराने निवडणुकीच्या आखाड्यात लढत दिली असती, तर सिद्धरामय्याना कदाचित येथून पराभवास सामोरे जावे लागले असते. अटीतटीच्या लढतीत केवळ हजार मताच्या फरकाने सिद्धरामय्या निवडून आले होते. कर्नाटकातील धनगर समाजाच्या काही कार्यक्रमात सिद्धरामय्या व महादेव जानकर हे यापूर्वी एकाच मंचकावर येताना अनेकवेळा एकत्र दिसलेले आहेत.

असो, हे सर्व चर्चा करण्याचे कारण की राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे आता सिध्दरामय्या यांच्याप्रमाणे परभणी व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार आहेत. तशी या दोन्ही लोकसभा मतदासंघातील त्यांच्या समर्थकांचे म्हणणे सातत्याने समोर येत आहे व तसे जानकर यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नही जोरदारपणे होताना दिसत आहेत.

रासपच्या बदामीतील राजकीय जीवदानामुळे सिद्धरामय्या विजयी झाले आणि पुढे कर्नाटकचे मुख्यमंत्रीही झाले. आता महादेव जानकर हे कोणत्या लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून संसदेत जाणार आहेत, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. 

निधर्मी जनता दलातून बाहेर पडलेल्या सिद्धरामय्या यांनी स्वतःचा पक्षही काढला होता. एकाच निवडणुकीचा अनुभव घेऊन त्यांनी काँग्रेससोबत घरोबा केला. त्यांनी काँगेसच्या पाठीशी जनमत उभ करून काँग्रेसला उभारी दिली. दोनवेळा मुख्यमंत्रीपद भूषवले. महादेव जानकर मात्र स्वतःचा पक्ष, झेंडा, अजेंडा ठेवून देश व राज्याच्या राजकारणात संघर्ष करताना दिसत आहे. मराठा, ओबीसी, दलित, मुस्लिम या समूहातून महादेव जानकर यांच्या उमेदवारीस, राष्ट्रीय समाज पक्षास पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यांना आगामी काळात कितपत यश मिळेल हा येणारा काळच ठरवेल.

Saturday, March 2, 2024

स्वयंसेवक : तात्यासाहेब राजाराम पुकळे

स्वयंसेवक : तात्यासाहेब राजाराम पुकळे

©७५ अमृत महोत्सव

महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये भक्ती, भाव, आणि सेवा या तीन गोष्टीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. रयत सेवक तात्यासाहेब राजाराम पुकळे यांनी केलेली, राष्ट्र - समाज भक्ती, भाव आणि सेवा हे अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्याकडून अनेक विद्यार्थी, पालक, गावकरी, नातेवाईक, शिक्षक यांना फार मोठी ज्ञानाची शिदोरी मिळालेली आहे, सहकार्य लाभले आहे. त्यांचे कार्य हे अत्यंत तळमळीने असायचे. पुकळे सर यांनी आपल्या वयाची पंचाहत्तरी पुर्ण केलेली आहे. त्यांच्या कुटूंबीयाकडून २ मार्च रोजी बचेरी ता- माळशिरस जिल्हा - सोलापूर येथे अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. हा सोहळा अत्यंत महत्वाचा असूनही प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही, त्याबद्दल क्षमस्व. आज माझ्याकडून व माझे आई, वडील यांच्यातर्फे श्री. पुकळे टी. आर. सर यांना अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्यदायी, सुख, समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे उर्वरित आयुष्य जावो, हीच ईश्वचरणी प्राथर्ना करून सदीच्छ्या व्यक्त करतो.

थोडी थोडकी नव्हे तर तब्बल सहा दशकांहून अधिक काळ सेवा बजावणारे समाजसेवक नव्हे तर 'स्वयंसेवक' श्री. तात्यासाहेब राजाराम पुकळे यांनी निस्वार्थ भाव ठेवून समाजाप्रती, राष्ट्रप्रति आपले कार्य सातत्याने कार्यरत ठेवलेले आहे. गावातील कोणतेही धार्मिक, सामाजिक कार्य असो, त्यात त्यांनी तन, मन, धन देऊन आपली सेवा बजावली आहे. तीर्थरूप 'कर्मवीर आण्णा' यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून रयत परिवारात रयतसेवक म्हणून सामजिक कार्याचा वसा आणि इंग्रजी विषयासाठी खास शैक्षणीक कार्याचा ठसा उमटला आहे.

गावात मास्तर म्हणून ओळख ते समाजाशी नाळ कायम ठेवणारा स्वयंसेवक

नागरीकरणापासून मागे राहिलेल्या धनगर समाजाचे बहुसंख्य वस्तीस्थान असणाऱ्या माणदेशी खेड्यातला जन्म. मेंढपाळ, पशुपालक, कृषी संस्कृतीचा जीवनावर प्रभाव दिसून येतो. गोरगरीब घरातील मुलांची आस्तेने विचारपूस करून त्यांना योग्य शैक्षणिक मार्गदर्शन करणे. गावातील मंदिर उभारणीचे काम; विशेषतः सिद्धनाथ मंदिराचे शिखराचे कामावर बारकाईने लक्ष देवून पूर्णत्वास नेईपर्यंत घेतलेला ध्यास, त्यासाठी दिलेला अमूल्य वेळ, शिक्षकी पेशा संभाळत असताना सुट्टीच्या काळात घरी आल्यानंतर आराम न करता थेट सकासकाळी हातात झाडू घेऊन मंदीर परिसर स्वच्छ करणे, सामाजिक अडीअडचणी सोडविण्यासाठी स्वतःला सतत गुंतवून  ठेवणे, कुटुंबासाठी वेळ कमी आणि समाजासाठी जास्त वेळ देणे, गावगाड्यातील तंटा सोडवण्यासाठी समन्वय साधणे, पारंपरिक पद्धतीने चालत आलेला धार्मिक सांस्कृतिक वारसा जपणे, ढोल कैताळ वादनाचा इतिहास परंपरा अभ्यास सांगणे, समाज प्रबोधनात्मक व्याख्याने, मार्गदर्शन करणे, गजी नृत्याची कला जोपासणे, शिवणकला, शेती कामासाठी उपयोगी येणाऱ्या कळकीच्या वस्तू तयार करणे, सेवानिवृत्त झाल्यानंतर शेतीच्या कामात गुंतवून घेणे, गावातील लग्न कार्यात मंगलाष्टके म्हणून नवदांपत्यास शुभ आशीर्वाद देणे, सण, यात्रा उत्सवात संचलन करणे,  दहावित शिकणाऱ्या गावातील मुलांना शून्य रुपयाची फी घेऊन इंग्रजी, गणित विषयाचे ज्ञानदान करणे. याहून जास्त प्रकारचे कार्य श्री. तात्यासाहेब राजाराम पुकळे सर यांनी गावगाड्यात राहून पूर्ण केलेले आहे. साधी राहणीमान, मनमोकळा स्वभाव, शिक्षकाप्रमाणे शिस्तप्रिय असणाऱ्या गुरुवर्य श्री. पुकळे टी. आर. सर यांना अमृत महोत्सवी वर्षात पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा...!.

|आबासो सुखदेव पुकळे, मुंबई 

२/३/२०२४

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...