Tuesday, May 31, 2022

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  यांना सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


सातारा, दि.31 (जिमाका): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी   अधिकारी व कर्मचारी   उपस्थित होते.


Monday, May 30, 2022

कोल्हापुरात राजमाता. अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

 अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कोल्हापूर शहरात भव्य शोभयात्रा काढून पार पडली. कोल्हापूर शहर धनगरी ढोलाच्या निनादात रमले होते. 


















Sunday, May 29, 2022

धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली समर्पित आयोगाची भेट

धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली समर्पित आयोगाची भेट


आज विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकाचे मागास प्रवर्गचे राजकीय आरक्षणसाठी मा सर्वोच्च न्यायालयाने विहित केलेल्या अटीची पुर्तता करनेसाठी गठीत केलेल्या आयोगाची धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्याध्यक्ष अनिलकुमार ढोले यांचे नेतृत्वाखाली भेट घेऊन चर्चा केली व नागरीकांच्या मागास प्रवर्गचे राजकीय आरक्षण संदर्भात आपली भूमिका आयोगाला पटवून दिली. नागारीकांच्या मागास प्रवर्गचे राजकीय आरक्षण कायम ठेऊन, त्याअंतर्गत व्हीजेएनटीसाठी स्वतंत्र आरक्षण ठेवणे  व व्हीजेएनटी भटक्या जमातीची जातनिहाय जनगणना करनेसाठी राज्य शासनाला शिफारस करनेची विनंती आयोगाला करण्यात आली. धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे शिष्टमंडळात राज्याध्यक्ष अनिलकुमार ढोले, उपाध्यक्ष विलास भाऊ डाखोळे, महासचिव शरद उरकुडे, कोषाध्यक्ष उज्वल रोकडे, सहसचिव रामचंद्र चुकांबे,नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष यशवंत कातरे, जिल्हा संघठक ज्ञानेश्वर बांबल, प्रसिद्ध प्रमुख श्याम ढोले यांचा समावेश होता.

याबाबतचे वृत्त श्याम ढोले, प्रसिद्ध प्रमुख, धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य ९०४९१२३०७४ यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Saturday, May 28, 2022

कासाबाई वीरकर प्रथम पुण्यस्मरण

 


कै. कासाबाई नाना वीरकर यांचे प्रथम पुण्यस्मरण मौजे. गटेवाडी पो- पिंपरी, ता - माण जिल्हा- सातारा येथे पार पडला.  कासाबई वीरकर यांचे कोरोना महामारीच्यासाथीने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, 2 मुले, सूना नातवंडे असा परिवार आहे.  कासाबाई वीरकर यांचा कुटुंबियांवर वरदहस्त होता. कडक स्वभाव पण तितक्याच मुलायम.  गावरान पद्धतीचे जीवन त्यांना प्रिय होते. 



समाजप्रबोधनकार ह.भ.प. सूरज महाराज अंतवडीकर यांचे कासाबाई विरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त प्रासंगिक कीर्तन पार पडले. ह.भ.प सूरज महाराज यांच्या अमोघ वाणीतून अमृतरुपी शब्द बाहेर पडले. संत तुकोबाराय यांच्या अभंगातील चरण सेवेकरीता घेतले होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग महाराजांनी कथन केले.  कासाबाई विरकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सकाळी वैदिक पद्धतीने विधिवत पूजा पार पडली. दहा वाजता कीर्तनाचा कार्यक्रम सुरू झाला. 12 वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली. महाराजांच्या किर्तनावेळी गटेवाडी परिसर टाळ, पकवाज, वीणा, मृदुंगाच्या निनादाने दुमदुमला. यावेळी वीरकर कुटुंबियांवर स्नेह व्यक्त करणारे नातेवाईक, ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Tuesday, May 17, 2022

शासनाकडून धनगर समाजावर अन्याय : प्रवीण काकडे

 






बुद्ध आणि मी - पैगंबर शेख

 बुद्ध आणि मी - पैगंबर शेख

कुठलाही व्यक्ती यासाठी ज्ञानी म्हणवला जात नाही, कारण तो फक्त बोलत राहतो. परंतु तो जर शांतीपूर्ण, प्रेमपूर्ण, आणि निर्भय आहे, तर तो वास्तवातच ज्ञानी म्हणवला जातो. 



- तथागत गौतम बुद्ध.  


माझ्यावर प्रभाव असलेल्या काहींपैकी गौतम बुद्ध एक विशेष नाव आहे. त्याला तशी कारण आहेत. काही बाबतीत खंत देखील आहे. पण जे त्यांनी केलं ते योग्यच असंही वाटत. 


गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व ५६३ वर्षे. त्यांची पहिली मूर्ती  इसवी सन ६०० च्या सुरुवातीला बनवण्यात आल्याचे माहीत आहे. पण लेण्यांची निर्मिती त्याहून आधीची असल्याने how is it possible ? हा प्रश्न पडतोच. असो, पण मला बुद्धांच्या मूर्ती आवडतात. मी मूर्तिपूजक नसलो तरीही मी त्या कलेचा मनापासून आदर करतो. 

बुद्ध धर्मात मुख्यतः तीन पंत आहेत. प्रत्येक धर्मात जसे मूळ व्यक्ती हयात नसताना गट पडतात तसेच बुद्ध धर्मात देखील पडले. हीनयान, महायान आणि वज्रयान हे तीन पंत आहेत. त्यापैकी महाराष्ट्र्रात आपण पाहत असलेल्या लेणी या हीनयान आणि महायान पंताच्या आहेत. याला ओळखणे अगदी सोपे आहे. स्तूपाच्या बाहेर जर बुद्धांची मूर्ती असली तर ती हीनयान लेणी असते आणि फक्त स्तूप असेल तर ती महायान लेणी. या दोन्ही लेणी वेगवेगळ्या कालखंडात बनवल्या गेल्या आहेत. 

मी मूळ व्यक्ती सोडून इतरत्र शक्यतो हालत नाही. परंतु मला बुद्ध कळाले ते बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. 'गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म' वाचल्यावर मला अष्टांग मार्ग समजला. सम्यक् दृष्टी, सम्यक् संकल्प, सम्यक् वाचा, सम्यक् कर्मान्त, सम्यक् आजीविका, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृती, सम्यक् समाधी याचा परिचय त्यातूनच मला झाला. सोबतच पंचशील मार्ग देखील यातूनच मला समजला. खरेतर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारून बौद्ध धर्माला भारतात पुनरुज्जीवित केले. हे अगदी निरपेक्ष भावनेने लिहावे वाटते. 


बौद्ध धर्म आणि त्याच्या लेणींची केलेली नासधूस पाहता. बुद्धांनी त्याकाळी शस्त्र का हाती घेतले नाही ? हा प्रश्न अनेकदा पडतो. कारण बुद्धांच्या नंतर मनुवाद्यांनी आपली वर्णवादी संस्कृती टिकवण्यासाठी जी काही हिंसा केली त्या हिंसेला जगात तोड नाही. याबाबत अधिक वाचायचे असल्यास प्रबोधनकार ठाकरेंचे 'देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे' हे पुस्तक अवश्य वाचावे. पण बुद्धांनी हिंसा केली नाही तेही बरेच झाले असेही वाटते. कारण धर्माच्या नावाने सर्वच धर्मीयांत न्याय कमी आणि अत्याचारच जास्त बोकाळत असल्याचे सध्या तरी दिसतो. आणि या अत्याचाराचा शेवट हिंसेवर जाऊन होतो हे त्याहून अधिक वाईट.

काही वर्षांपूर्वी तालिबानींनी बुद्धांची मूर्ती तोडल्याची आणि ती नष्ट केल्याची बातमीही पाहण्यात आली होती. मुळात मूर्तिपूजक नसावे, याचा अर्थ मूर्ती भंजक असावे असा होत नाही. मूर्तिपूजक का नसावं ? त्यामागच कारण समजून घेणं महत्वाचं आहे. ते समजलं तरी पुरे. तालिबान्यांना बुद्ध समजले असते तर त्यांनी तस केलं नसत. पण दुर्दैव, त्यांना फक्त मूर्ती दिसली. बुद्धांचा विचार दिसला नाही. 

बुद्ध 'अत्त दीप भव' म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा म्हणतात. मला हा विचार जास्त महत्वाचा वाटतो. सोबत अष्टांग मार्ग आचरणात आणणेही महत्वाचे. 

बुद्धांवर माझं कायम विशेष प्रेम राहिलं आहे. २५०० वर्षांपूर्वी मी देव नाही, मी देवदूत नाही, मी प्रेषित नाही. मी फक्त मानव आहे हे सांगून आपल्या विचारांच्या प्रसाराने जगावर प्रभाव पडणारे सर्वोत्तम भूमिपुत्र म्हणजे गौतम बुद्ध. 


मी ध्यानधारणा बुद्धांकडून शिकलो. तसेच एक मोठा विचार जास्त महत्वाचा आहे. कुठलीही गोष्ट निश्चित नाही. गोष्टींमध्ये सतत बदल होत असतो. जीवनात कधीही कुठेही थांबलो आहे असे वाटेल, त्यावेळी या विचारावर नक्कीच चिंतन मनन करावे. कधी शांत रहावे. तर कधी होणाऱ्या बदलाचा भाग व्हावे. 

मी बुद्धांकडून एवढंच शिकलोय. बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. भवतु सब्ब मंगलम्...

- आयु. पैगंबर शेख

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...