Saturday, February 26, 2022

सदगुरु संत बाळूमामा बगा नं ७ पुकळेवाडीत दाखल, भक्तांच्या गर्दीने भक्तीचा शिवार फुलला

दिनांक . १७ फेब्रुवारी २०२२ रोजी सद्गुरू संत बाळूमामा मेंढर बगा नंबर ७ पुकळेवाडी तालुका माण, जिल्हा सातारा येथे दाखल झाला. विठोबा मंदिर पुकळेवाडी येथे सद्गुरू संत बाळूमामा रथाचे आगमन झाले. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे संत बाळुमामा रथाचे जोरदार स्वागत केले. डोक्यावर कळशी, हातात आरती घेऊन रस्त्याच्या दुतर्फा भाविक भक्तांची मोठी गर्दी केली होती. गावात आनंदाचे वातावरण पसरले होते. लहान थोर जमा झाले आणि बाळूमामा नमशिवाय असा गजर केला.






संत बाळुमामा यांचा उद : शिदोबा देवाला

सद्गुरू संत बाळूमामा यांचा 'उद' श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळाप्रसंगी श्रीनाथ दरबारात पोहचला. ग्रामस्थ मंडळ पुकळेवाडी यांनी उत्कृष्टपणे नियोजन केले. विवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविकभक्त आले होते. चिंचणी आई मायाक्कादेवी यात्रेसाठी आलेल्या भाविक भक्तांनी देवाची लग्नासाठी हजेरी लावली. सासन काठ्या नाचवत श्री. सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी देविचे मनोभावे दर्शन घेऊन खासगी वाहनाने चिंचणी (कर्नाटक) च्या दिशेने रवाना झाले.






पुढे इराची खडी, शेळकेवस्ती येथे बाळूमामा रथ रवाना झाला.  शेळकेवस्ती येथे नागरिकांनी  साधेपण आणि धार्मिक भाव ठेऊन संत बाळूमामा यांच्या मेंढ्याचे  पूजन केले. 



















संत सद्गुरू बाळूमामा यांची मेंढरं पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी भावीक भक्तांची गर्दी दाटली. भक्तीचा जनसागर उसळला होता.  पुकळेवाडी परिसरात संत बाळूमामा रथ उत्सवप्रसंगी धनगरी गजी नृत्य, ओव्या, लोकगीते आदी कार्यक्रम पार पडले.  सद्गुरू संत बाळूमामा मेंढर पुकळेवाडीत दाखल झाल्याने, पुकळेवाडी शिवारात भक्तीने शेत फुलला. या दरम्यान, ग्रामपंचायत, ग्रामस्थ, युवक यांनी खूप मोठ्या उत्सहाने परिश्रम घेतले. महाप्रसादाचा लाभ दूरवरून आलेल्या भाविकासह गावकऱ्यांनी घेतला. 



No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...