शिर्डीतील राष्ट्रीय अधिवेशनात रासपने केला एक कोटी सदस्य नोंदणीचा निर्धार
रासपच्या सॉफ्टवेअरचे उदघाटन; प्रत्येक राज्यात रासप निवडणुका लढणार
शिर्डी / राष्ट्र भारतीद्वारा
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन शनिवार दि. १९ डिसेंबर व रविवार दि. २० डिसेंबर २०२० रोजी शिर्डी साईबाबा नगरीत उत्सहात पार पडले. 'एक कोटी सदस्य नोंदणी' करण्याचा निर्धार राष्ट्रीय अधिवेशनात केला. महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रीय समाज पक्षाचे ५० आमदार व १० खासदार, गुजरात राज्यात २५ आमदार व ४ खासदार, उत्तर प्रदेश राज्यात ३५ आमदार १० खासदार जिंकण्याचा संकल्प रासप केला.
अधिवेशनासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष 'राष्ट्रनायक' महादेवजी जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, के प्रसन्नाकुमार, राष्ट्रीय संघटक महाराष्ट्र प्रभारी पंडित घोळवे, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, गोविंदराम सुरनर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, महाराष्ट्र राज्य मुख्यमहासचिव बाळासाहेब दोडतले, गुजरात प्रदेशाध्यक्ष राजेश आयरे, गुजरात प्रदेशउपाध्यक्ष ऋतुराज शास्त्री, राजस्थान प्रभारी सुशील शर्मा, गोवा प्रदेशाध्यक्ष किशोर राव, कर्नाटक राज्य संयोजक धर्मान्ना तोंटापुर, राष्ट्रीय सचिव एम जी माणिशंकर, तमिळनाडू महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष कयालविझी, दिंडीगुल-तमिळनाडू जिल्हाध्यक्ष राम कृष्णन, उत्तर प्रदेश संघटक रामनरेश, दिल्ली संघटक भुऱेसिंह एस एस पाल, गोवा राज्य सचिव सलमान खान, उत्तर प्रदेश महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष प्राची शर्मा, पुर्वांचल अध्यक्ष वीरेंद्र प्रताप पाल, उत्तर प्रदेश युवा आघाडी अध्यक्ष अशुंमन सिंह, बिहार निवडणूक निरीक्षक प्रदीप कुमार पाल आदी उपस्थित होते.
रासपच्या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्यासह देशातील सात राज्यातून 'राज्य प्रतिनिधी' उपस्थित होते. प्रत्येक राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे संघटनात्मक स्थान काय ? यावर राष्ट्रीय कार्यकारिणीने आढावा घेतला. देशातील प्रत्येक राज्याच्या विधिमंडळात राष्ट्रीय समाज पक्षाचे जास्तीत जास्त विधानसभा सदस्य व संसद सदस्य निवडून आनण्यासाठी अहोरात्र कष्ट घेण्यात यावे. प्रत्येक राज्यातील संघटना वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करण्याची आवश्यकता आहे. यावेळी पक्षाचे सॉफ्टवेअरचे उदघाटन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष 'राष्ट्रनायक' महादेव जानकर यांच्याहस्ते करण्यात आले. देशातील सर्व राज्यात 'ऑनलाईन सभासद नोंदणी अभियान' लवकरच सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले. प्रमुख पदाधिकाऱ्यांना नवी ऊर्जा व नवी उमेद घेऊन आपआपल्या राज्यात काम करण्याचे निर्देश राष्ट्रीय कार्यकारिणीने दिले. चार सत्रात अधिवेशन पार पडले.
अधिवेशनानंतर रासप महासचिव कुमार सुशील यांनी राष्ट्रीय अधिवेशन उत्सहात झाले; अशी प्रतिक्रिया दिली. तर कर्नाटक राज्य सचिव अनिल पुजारी म्हणाले, कर्नाटक राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रासप लढणार आहे, तसेच कलबुर्गी ते नंदगड(बेळगाव) अशी दुचाकी रॅली काढणार आहे. फेब्रुवारी महिन्यात विजयपूर येथे मेळावा घेणार आहे. राष्ट्रीय सचिव माणिशंकर म्हणाले, तमिळनाडू प्रदेशाध्यक्षाची हकालपट्टी केली असून नवीन प्रदेशाध्ययक्ष आर मुरगन यांची नियुक्ती केली आहे.
बातमी संकलन : आबासो पुकळे
No comments:
Post a Comment