Wednesday, August 5, 2020

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या देखील कोरोना बाधित...


माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या देखील कोरोना बाधित...


कर्नाटक / बेंगलुरु (प्रतिनिधि) : देशभरात कोरोनाने थैमान घातले असून सर्वसामान्य ते अनेक सेलिब्रेटी,राजकीय नेते हे देखील या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. ते ७१ वर्षीय असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून देखरेख ठेवली जात आहे. अशी माहिती मणीपाल रुग्णालयाने निवेदनात दिली. 

धनगर / कुरुबा समाजातुन आलेले सिद्धरामय्या हे मास लीडर म्हणून ओळखले जातात. ते काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. ते देशातील पाहिले मुख्यमंत्री आहेत की जे धनगर समाजातुन आलेले आहे. सिद्धरामय्या यांनी २०१३ ते २०१८ या काळात कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळला असून सद्या ते विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळत आहेत.

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. “माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी लक्षणे तपासण्याची आणि स्वत:ला क्वॉरन्टाईन ठेवण्याची विनंती करतो” असे ट्वीट सिद्धरामय्या यांनी केले आहे. 

सिद्धरामय्या यांच्या मुलाने सांगितले, वडिलांना सोमवारी ताप आला होता. त्यानंतर कोरोना अँटिजन चाचणी केली. ज्यात त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. कर्नाटकमधील कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडलेले सिद्धरामय्या हे दुसरे मोठे नेते आहे, याआधी भाजप नेते मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा हेही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे.

मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी कन्नडमध्ये सिद्धरामय्या यांना टॅग करून एक ट्विट केले, “पूर्व मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांची कोरोना संक्रमित विषयी बातमी ऐकून हैराण झालो. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहे, तुम्ही लवकरच बरे होऊन लोकांच्या सेवेत रुजू व्हाल"

Saturday, August 1, 2020

पुकळेवाडीत बाजरी, मका पिके वादळी वाऱ्यासह भुईसपाट

पुकळेवाडीत बाजरी, मका पिके भुईसपाट

दि.१ ऑगस्ट २०२०, पुकळेवाडी.
माण तालुक्यातील पुकळेवाडी येथे गुरुवारी व शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी पाऊस वाऱ्यामुळे बाजरी व मका ही पिके जमिनीवर आडवी झाली असून प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही शेतकऱ्यांकडून भुईसपाट झालेले पिक उभे करुन बांधन्याचा प्रयत्न सुरु आहे. पुकळेवाडीच्या शिवारात बाजरीचे पिक पोटऱ्यात व काही ठिकाणी निसावले आहे. पण हेच पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी चिंतातुर आहे.

पुकळेवाडीसह संपूर्ण माण तालुक्यावर दुष्काळाचे सावट कायम असते. मात्र  खरीप हंगामात सुरवातीस झालेल्या पाऊसाच्या हलक्या सरी कोसळल्यानंतर पुकळेवाडी येथील शेतकऱ्यांनी कमी ओलीत बाजरी व मका पिकाची पेरणी केली होती. काही शेतकऱ्यांवर बाजरीचे पीक दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. मका पिकावर किडीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून वाऱ्यासह पावसाची हजेरी लागत असल्यामुळे बाजरी, मका हे संपूर्ण पिकच वाया जाण्याची भिती व्यक्त होत आहे. 

पुकळेवाडीसह परिसरात शुक्रवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जोरदार वाऱ्यायामुळे फुलोऱ्यात आलेले बाजरीचे पिक भुईसपाट झाले आहे. पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यामधून होत आहे.

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...