Monday, December 30, 2019

दत्तामामा भरणे मंत्री झाले.

आमदार दत्तात्रेय भरणे यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ


महाराष्ट्र विधानसभेतील धनगर समाजाचे एकमेव सदस्य आमदार दत्तात्रय भरणे यांनी आज दिनांक ३० डिसेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली.

इंदापूर विधानसभा मतदार क्षेत्राचे आमदार दत्तात्रेय भरणे शेतकरी कुंटूबातील साधे व्यक्तीमत्व म्हणून परिचित आहे. कुंटूबाला राजकारणातील घराणेशाहीचा वारसा नाही. केवळ पक्षनिष्ठा व विकासकामांच्या जोरावर आज मंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे. 

१९९२ साली वयाच्या २२ व्या वर्षी भवानीनगरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालकपदापासून त्यांची सुरवात झाली. १९९६ साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालकपदी काम करण्याची संधी मिळाली. संचालक पदाच्या संधीचे सोने करुन शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्‍न मार्गी लावले. २००१ साली जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष होण्याचा बहुमान भरणे यांना मिळाला.

यानंतर २००३ ते २००८ पर्यत भवानीनगरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची अध्यक्ष म्हणून धुरा संभाळली. २००९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये बंडखाेरी करुन निवडणूक लढविली. मात्र निवडणूकीमध्ये थोड्या मतांनी पराभव झाला. २०१२ साली  भरणे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून थेट पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षच झाले. 

इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी आणून विकासकामांच्या जोरावर भरणे यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक सहज जिंकली. पाच वर्षामध्ये विराेधी पक्षाचा आमदार असतानाही जिल्हामध्ये सर्वाधिक निधी खेचून आणून तालुक्याचा विकास केला. याच काळामध्ये सत्ताधारी भाजपने अनेक आमिष दाखवून पक्षामध्ये घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र या आमिषाला भरणे बळी पडले नाहीत. त्यांनी पक्षनिष्ठा सोडली नाही.  विकासाच्या जोरावर २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भरणे यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा दुसऱ्यादां पराभव केला. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली असून संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही.

आमदार दत्तात्रेय भरणे यांनी २०१४ च्या विधानसभागृहात धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर आवाज उठविला होता. ७ ऑगस्ट २०१८ ला मराठा, धनगर समाज्याच्या आरक्षण प्रश्नावर विधानसभा सदस्यत्वचा राजिनामा देण्याची घोषणा केली होती. आ. भरणे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रातील धनगर समाजात उत्साहाचे वातावरण आहे.

नाव- दत्तात्रेय विठोबा भरणे
वय- ५०
मतदार संघ- इंदापूर
शिक्षण-  पदवीधर (बी.कॉम) 
पक्ष- राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी

राजकीय कारर्किद -

श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक - १९९२ ते 
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष- २००३ ते २००६
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक - १९९६
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष  - २००१ते २००३ 
पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व अध्यक्ष- २०१२ ते २०१४
इंदापूर तालुक्याचे आमदार - २०१४ ते २०१९
इंदापूर तालुक्याचे दुसऱ्यांदा आमदार- २०१९, आता महाराष्ट्राचे राज्यमंत्री






Sunday, December 22, 2019

श्रीनिवास रामानुजन

३२ वर्षाच्या आयुष्यात भारतीय गणिताचे सामर्थ्य जगाला दाखवून देत भारताचा बहुमान वाढवणारे थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुज़न यांच्या १३२ व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रर्तिमेस विनम्र जय मल्हार ! व राष्ट्रीय गणित दिनाच्या शुभेच्छा !
π%°√{} ~^* ♾➗✖➕➖📊🧮




Friday, December 20, 2019

महाराणी तुळसाबाई होळकर

महाराणी  तुळसाबाई होळकर यांच्या २०२ व्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन !


कटा हाथ भी मचल उठा था,गद्दारों की गर्दन को।

पैर कटा भी चल उठा था,मक्कारों के मर्दन को।।
शीश कटा रानी का धड से,सृष्टि का सिरमौर हुआ।
गिरते-गिरते गर्व से बोला,जागो वीर भौर हुआ।।
वीरांगना तुलसाबाई होलकर अमर रहे !

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पत्नी महाराणी तुळसाबाई होळकर यांनी इंग्रजांविरुद्ध बाल राजकुमार मल्हारराव होळकर (द्वितीय ) गादीवर बसवून राज्यकारभार करत ब्रिटिशांचे मनसुबे धुळीस मिळवले. तसेच इंग्रजांविरुद्ध घनघोर युद्ध केले. लढता- लढता क्षिप्रा नदीच्या काठावर 'महारानी'स बलिदान द्यावे लागले.
उज्जन - महिदपुर महामार्गावर त्यांच्या नावाने तुळसापुर नावाचे गाव वसले आहे.






Monday, December 9, 2019

सरंजामी मरहट्टे पुस्तक प्रकाशन

ऐतिहासिक स्थळांच्या जतनासाठी शासनाच्या योगदानाची गरज : युवराज खासदार संभाजीराजे 

'सरंजामी मरहट्टे' पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

पुस्तक प्रकाशन करताना  खा. संभाजीराजे छत्रपती, श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर, श्रीराम पवार, सेवानिवृत्त प्राचार्य  सुरेश महानवर, डॉ. सुवर्णलता जाधवराव, लेखक प्रा. संतोष पिंगळे.

महाराष्ट्राला पराक्रमी इतिहासाचा मोठा वारसा असून त्याची साक्ष देणारी ऐतिहासिक स्थळे आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा स्थळांचे जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन युवराज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. ते प्रा. संतोष पिंगळे लिखित 'सरंजामी मरहट्टे' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी काल पुण्यात बोलत होते.

पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना खा. संभाजीराजे छत्रपती. बाजूस मान्यवर.
युवराज संभाजीराजे पुढे बोलताना म्हणाले, छत्रपतींच्या राज्याच्या विस्तारासाठी अनेक घटकांचे योगदान मिळाले आहे. त्यामुळे त्यांचा इतिहास देखील जतन झाला पाहिजे. याकरिता महाराष्ट्रातील गडकिल्ले, गढ्या व वाडे यांचे जतन करण्यासाठी शासनाने योगदान देणे गरजेचे आहे. गणिताचे प्राध्यापक संतोष पिंगळे इतिहासाचे संदर्भासहीत पुस्तक लिहितात, हे आजच्या सोहळ्याचे वेगळेपण आहे.
पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करताना युवराज खा. संभाजीराजे छत्रपती, श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर, श्रीराम पवार, सेवानिवृत्त प्राचार्य  सुरेश महानवर, डॉ. सुवर्णलता जाधवराव, लेखक प्रा. संतोष पिंगळे.
पुणे येथील कोथरुडमधील हर्षल हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर होते. यावेळी सकाळचे संपादक श्रीराम पवार, पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, लेखिका डॉ. सुवर्णलता जाधवराव व मरहट्टी संशोधन विकास मंडळाचे अध्यक्ष सुरेश महारनवर आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, सकाळचे संपादक श्रीराम पवार, डॉ. सुवर्णलता जाधवराव, प्रा. संतोष पिंगळे, सुजाताराजे पांढरे, प्रशांत लवटे आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप माने यांनी केले. तर सूत्रसंचालन अॅड. प्रणव पाटील यांनी केले. शेकडो इतिहासप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात देशभरातून आलेल्या मध्ययुगीन सरंजामी घराण्याच्या वारसदारांचा खा. संभाजीराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाची क्षणचित्रे >>>
पुस्तकप्रकाशन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर बोलताना.
'सरंजामी मरहट्टे' पुस्तकाचे लेखक प्रा. संतोष पिंगळे पुस्तकप्रकाशन प्रसंगी बोलताना











Sunday, December 1, 2019

माणदेश मॅरेथॉन स्पर्धा - डिसेंबर २०१९

माणदेश मॅरेथॉन स्पर्धेत पुकळेवाडीचा बाळू पुकळे तिसरा



माणदेशात आज ‍१ डिसेंबरला पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील धावण्याच्या स्पर्धेत पुकळेवाडीच्या बाळु पोपट पुकळे या गुणवंत खेळाडूने तिसरा क्रमंक पटकावलाय. 'वडूज रनर्स फौंडेशन'च्यावतीने माणदेश मॅरेथॉन स्पर्धा आयोजीत केली होती.  या स्पर्धेच्या ब्रँड ऍम्बीसिडर होत्या माणदेशी कन्या आतंरराष्ट्रीय धावपटू अर्जुन पुरस्कारप्राप्त ललिता बाबर. 

पुकळेवाडीचा धावपट्टू बाळू पुकळे या खेळाडूने जीवाची बाजी लावून २१ किलोमीटरचे अंतर १ तास १३ मिनीटं ३३ सेकंदात पार केल. माणदेश मॅरेथॉन स्पर्धेत बाळू पुकळे विजयी धाव घेताच पुकळेवाडी ग्रामस्थांनी कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव केला. या स्पर्धेत पुकळेवाडी गावातून २० खेळाडूंनी सहभाग घेतला.  पुकळेवाडीतील सहभागी खेळाडूंसाठीचा खर्च तुषार जालिंदर पुकळे यांनी केला.  स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना ग्रामस्थांनी प्रोत्साहन दिले.
माण-खटाव तालुक्यातील ही हाफ मॅरेथॉन स्पर्धा दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर आयोजीत केली होती. माण-खटाव तालुक्यातील एका शहरापासून दुसर्‍या शहरापर्यंत म्हणजे गोंदवले ते वडूज अशी स्पर्धा होती. २१ किलोमीटर धावण्याची स्पर्धा सकाळी ६ वाजता, ५ किलोमीटर सकाळी ८:३० वाजता व दोन किलोमीटर ९ वाजता सुरू झाली. २१ किलोमीटरच्या स्पर्धेची सुरवात गोंदवले बुद्रुक, दहिवडी, पिंगळी, मांडवे ते वडूज या मार्गे होती. धावपटूंना चेअरअप देण्यासाठी दर १ किलोमीटर वर पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन, तसेच ऊर्जा येण्यासाठी अंडी, केळी, पिण्याचे पाणी, थंड पेये, ओआरएस ठेवण्यात आले होते. 
सहभागी झालेल्या स्पर्धकांना टी-शर्ट, टायमिंग चिप, मेडल व जेवण देण्यात आले. स्पर्धेसाठी २१ किलोमीटरसाठी  १०५४ तसेच २ व ५ किलोमीटरसाठी १५०० धावपटूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत महिला-पुरुष सहभागी झाले होते.




चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...