ऑल इंडिया रिझर्व्ह बँक ओबीसी वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष, रासपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. एस. एल. अक्किसागर साहेबांची भेट
प्रखर बुध्दीवादी व्यक्तीमत्व असणारे मा.अक्किसागर साहेब यांनी इंडिया रिसर्च सेंटर, बहुजन जागृती केंद्र, मल्हार भारती जागृती केंद्र सारख्या विचार मंचाद्वारे विविध सामाजिक, राजकिय विषयावरील चर्चासत्रात सक्रिय सहभाग घेतलेला आहे. पत्रकारितेचा वारसा/प्रशिक्षण/अनुभव नसताना सामाजिक, राजकिय, ऐतिहासिक, सांस्कृतिक विषयांवर नानाविध पत्रलेखन/समिक्षण/ स्फूट लेखन/वृत्तलेखन त्यांनी केले आहे.
मा. अक्किसागर साहेब रोज कुठे ना कुठे तरी देशाच्या कानाकोपर्यात कार्यक्रमानिमित्त भ्रमण करित असतात. कर्नाटक दौर्यावरुन आलेले मा. एस. एल. अक्किसागर साहेबांची काल मुंबईत भेट झाली.
अखिल मानव जातिच्या कल्याणासाठी देह झिजवणारे संत कनकदास यांच्यावर त्यांनी मराठीत लिहलेले पहिले पुस्तक 'सत्यशोधक-दंडनायक(राजा) संत कनकदास' या पुस्तकाची प्रत भेट दिली. साहेबांच्या प्रत्यक्ष भेट व बोलणे झाले याचे खूप समाधान वाटले.
"शुध्दी- शुध्दी असे, सारखे का घोकता?
शुध्दीचा अर्थ, तुम्ही न जाणता ॥
भगवे कपडे घातल्याने कोणी पवित्र ठरत नसून ईश्वराची मनापासून केलेल्या अाराधनेत आणि मानव सेवेत खरी शुद्धी असल्याचे संत कनकदास सांगतात. शेण-मुत्राने धुवून शरीर शुद्ध होत नसून काम, क्रोध, विषय, वासना द्वेष, अहंकार आदी दुर्गुणाचा त्याग केल्याने माणूस शुध्द होतो, असे कनकदास सांगतात. धर्माचे खोटे अवडंबर करणाऱ्यांवर, देवपूजेचे/धार्मिकतेचे प्रदर्शन करणाऱ्यावर, लोकलाजेस्तव/भीतीपोटी/आशेपोटी केल्या जाणाऱ्या देवपूजेवर/धार्मिकतेवर संत कनकदासांनी कठोर आसूड ओढले आहेत. अहंकार, द्वेष, मत्सर आदी दुर्गुणांपासून मन शुद्ध करणे सोडून भल्या पहाटे उठून नदीत स्नान करण्याला काही अर्थ नाही, असे संत कनकदास म्हणतात. स्वार्थाचा फसव्या वृत्तीचा त्याग न करता सोन्या चांदीचे देऊळ उभारणाऱ्यांमध्ये धार्मिकता नसल्याचे संत कनकदास सांगतात. मनात परस्त्री गमन भावना ठेवून किंवा मना अशुद्ध ठेवून माळ जपणे, मंत्र उच्चार करणे, सोवळे नेसणे, धार्मिकदृष्ट्या निरर्थक आहे, असे कनकदास सांगतात. श्रद्धेचे/पूजेचे ढोंग करणे एक प्रकारे एखाद्या अभिनेत्रीच्या/वेश्येच्या सौंदर्य प्रदर्शनासारखे आहे. केवळ अहंकारचा त्याग करून अादिकेशवाला समाधीन झाल्याने सत्य-असत्य यामधील फरक कळू शकतो, असे संत कनकदास आपल्या किर्तनातून सांगतात.
संतसंगाची साथ जयाला
पवित्र नद्यांची आंघोळ कशाला?
सत्यबोध झाले जयाला
चिंता कशाची असेल तयाला?
उपयोग ना मला, ना दुसर्याला
असे धन हवे कशाला?
निती नाही, आदर्श नाही
असा राजा हवा कशाला?
असे प्रश्न समोर ठेवून कनकदास समाजाचे प्रबोधन करीत असल्याचे दिसते.
-मुंबई,१ जुलै २०१९.

'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरुर कळवा.
ReplyDeleteकृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-आबासो पुकळे