Tuesday, January 6, 2026

राष्ट्रीय समाज पक्ष व अखिल भारतीय कोळी समाज तर्फे डॉ. संतोष (डीटी) व राम अवतार कोळी यांचा सत्कार

राष्ट्रीय समाज पक्ष व अखिल भारतीय कोळी समाज तर्फे डॉ. संतोष (डीटी) व राम अवतार कोळी यांचा सत्कार


कलबुर्गी : समाजसेवा, संघटना आणि राजकारणाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे डॉ. संतोष (डीटी), आयआयटी खरगपूर (डीन, सीयूटीएम, ओडिशा) आणि उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ सामाजिक नेते राम अवतार कोळी यांचा अखिल भारतीय कोळी समाज आणि राष्ट्रीय समाज पक्षातर्फे सत्कार आणि सन्मान करण्यात आला.

सत्कार समारंभात बोलताना, अखिल भारतीय कोळी समाज आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नूर म्हणाले की, देशातील विविध राज्यांमध्ये कोळी समाजाच्या एकता, सामाजिक न्याय, हक्कांचे संरक्षण आणि शैक्षणिक - आर्थिक विकासासाठी काम करणारे डॉ. संतोष (डीटी) आणि राम अवतार कोळी यांची सेवा अत्यंत प्रशंसनीय आहे. समाजाला योग्य दिशा दाखविण्याची शक्ती असलेल्या या नेत्यांचे त्यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत मावनुरा म्हणाले की, कोळी समाजाच्या मागण्या, संघर्ष आणि समाजाला संघटित शक्ती म्हणून नेण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी समाजातील तरुण पिढीला प्रेरणा देणारे त्यांचे कार्य सुरू ठेवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

समारंभात डॉ. संतोष (डीटी) आणि राम अवतार कोळी यांना हार, शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मान स्वीकारल्यानंतर बोलताना त्यांनी हा सन्मान संपूर्ण कोळी समाजाला समर्पित केला आणि येणाऱ्या काळात समाजाच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि विकासासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमात अखिल भारतीय कोळी समाजाचे राज्य आणि जिल्हा पदाधिकारी, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते, मान्यवर, युवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नूर, जिल्हाध्यक्ष श्रीमंत मावनूर, बसवराज रौरा, रमेश शहााबाद आणि इतर अनेकजण उपस्थित होते.

पनवेल महानगरपालिका निवडणूक : मुख्य निवडणूक निरीक्षकांनी घेतली आढावा बैठक

पनवेल महानगरपालिका निवडणूक : मुख्य निवडणूक निरीक्षकांनी घेतली आढावा बैठक


पनवेल : महानगरपालिका निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज असून प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांकडून सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मुख्य निवडणूक निरीक्षक कैलास पगारे (भाप्रसे) म्हणून यांची आणि निवडणूक निरीक्षक म्हणून मनिषा कुंभार (अप्पर जिल्हाधिकारी) यांची नेमणूक झाली आहे. आज निवडणूक निरीक्षकांनी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्या उपस्थितीत निवडणुकविषयक सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक महापालिका मुख्यालयात घेतली. या बैठकीत निवडणूक विषयक झालेल्या सर्व तयारीचा आढावा घेण्यात आला.

      पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे आणि अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांनी निवडणूक विषयक झालेल्या सर्व कामकाजाची संक्षिप्त माहिती निरीक्षकांना दिली. यामध्ये ईव्हीएम व्यवस्थापन, शासनाच्या विविध विभागाच्या समन्वयाने केलेले नियोजन, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि प्रशिक्षण, निवडणूक साहित्यविषयक तयारी, विविध पथके आणि नोडल अधिकाऱ्यांमार्फत केले जाणारे कामकाज याबाबत माहिती दिली.

       यावेळी निरीक्षकांनी निवडणूक विषयक विविध कामांची सद्यस्थिती जाणून घेऊन विविध सूचना दिल्या. निवडणूक विषयक जबाबदाऱ्या पार पाडताना केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे सांगितले. मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) व्यवस्थापनाबाबत माहिती घेताना निरीक्षकांनी याबाबत झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, यंत्रांची सिलिंग व सुरक्षा, याबाबतचे रेकॉर्ड राखणे इत्यादी कामकाजाचा आढावा घेतला.

       विशेष मतदान केंद्रे स्थापन करताना आदर्श मतदान केंद, पिंक मतदान केंद्र, ग्रीन मतदान केंद्र याबाबत माहिती घेतली. दिव्यांग बांधवांसाठी मतदान केंद्रांवर केलेल्या सोईसुविधांवर चर्चा करताना सद्यस्थितीतील सोईसोबत दिव्यांग बांधवांसाठी अधिकचे तात्पुरते रॅम्प उभारले जाणार असल्याबाबत चर्चा झाली. स्वीप कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती देताना नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे जनजागृती करताना मतदान जास्तीत जास्त वाढविण्याबाबत लक्ष्य असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

      मतदान केंद्रावर अत्यावश्यक व आरोग्यविषयक सुविधांबाबत आढावा यावेळी निवडणूक निरीक्षकांनी घेतला. आचारसंहितेचे कडक पालक करण्याच्या दृष्टीने खर्च, मद्य वाटप, अवैध वस्तूंची वाहतूक याबाबत स्थिर सर्वेक्षण पथके, व्हिडीओ व्हीव्हिंग पथके, भरारी पथके या विविध पथकांच्या तसेच पोलीस विभाग, परिवहन विभाग, उत्पादन शुल्क विभाग या विविध विभागांच्या समन्वयाने चालू असलेल्या कामकाजाबाबत माहिती घेतली. 

       मनुष्यबळ व्यवस्थापनाबाबत माहिती घेताना एकूण 3625 कर्मचाऱ्यांचे झालेले प्रशिक्षण, कामकाजाचे केलेले वाटप, प्रशिक्षणाचे विविध टप्पे आणि कालावधी, तयार करण्यात आलेली एकूण 725 पथके याबाबत चर्चा झाली. मतदानासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्य व्यवस्थापनाचा आढावा घेताना सर्व साहित्यविषयक तयार पूर्ण झाली असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार तात्काळ साहित्य पुरवले जात असल्याचे सांगितले. निवडणूक विषयक कामकाज अत्यंत शिस्तबद्ध चालू असल्याबाबत निवडणूक निरीक्षकांनी समाधान व्यक्त केले.

 #PanvelMunicipalCorporation 

#election2025 

#election

#ElectionCommission 

#election2025updates 

#vote

#democracy

गुंडगिरी, पैशांचे अमिष, जीवानिशी ठार मारण्याच्या धमक्या महानगरपालिका निवडणुकीचा भाजपा नवा पायांडा !

गुंडगिरी, पैशांचे अमिष, जीवानिशी ठार मारण्याच्या धमक्या महानगरपालिका निवडणुकीचा भाजपा नवा पायांडा !

- शिवसेना नेते माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांचे खरमरीत पत्र व्हायरल 


धुळे : गुंडगिरी, पैशांचे अमिष, जीवानिशी ठार मारण्याच्या धमक्या महानगरपालिका निवडणुकीचा भाजपा नवा पायांडा ! अशा शब्दात माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी पत्रक काढून भावना व्यक्त केल्या आहेत. श्री. गोटे यांनी म्हटले आहे, विरोधकांना कुणी प्रत्यक्ष भेटून, फोन करून, त्यांच्या घरी जाऊन आणि नामचीन गुंड पाठवून, निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दबाव तंत्र. तीन मुले असलेल्या महिलेच्या उमेदवारीवर हरकत घेऊनही, अधिकाऱ्यांनी त्या महिलेचा उमेदवारी अर्ज स्वीकारला. कायदे जणू यांच्या कार्यालयात मंजूर झाले का ? असा सवाल श्री. गोटे यांनी केला आहे. 

आता बंड केलेच तर तुमच्या बंडातील ताकदीची पक्षाला ओळख तरी करून द्या! असे आवाहन शिवसेना नेते माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी भाजपच्या बंडखोर तरुण उमेदवारांना केले आहे.

पत्रात श्री. गोटे म्हणतात, महाराष्ट्रभर सर्वच महानगरपालिकांमध्ये जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र भाजपामध्ये नव्या गुंड, बदमाश, बलात्कारी लोकांना घेऊन, भाजपाने महाराष्ट्रातील राजकारण पाकिस्तान, बांगलादेश पेक्षाही खालचे स्तराला नेले. त्यांच्याच पक्षातील महिला, कधीकाळी मंत्री राहिलेल्या नेत्यांच्या कानाखाली जाळ काढत आहेत. तर, निष्ठावंत कार्यकर्ते ढसाढसा रडत आहेत. नव्याने आयात केलेल्या सर्व गुंड बदमाषांना भाजपाने पायघड्या घालून उमेदवारी दिली. पक्षासाठी रात्रंदिवस कष्ट उपसणाऱ्या आणि कठीण परिस्थितीत पक्षासोबत राहिलेल्या, सर्व एकनिष्ठ उमेदवारांना डावलण्यात आले. त्यांना विश्वासात सुद्धा घेतले नाही. अशा धक्कादायक घटना सर्वत्र घडल्या आहेत. कधी नव्हे एवढी गुंडगिरी महापालिका निवडणुकीत दिसून येत आहे. आश्चर्य असे की, सरकार मान्य गुंडगिरी व सरकार पुरस्कृत गुंडगिरी ही पहिल्यांदाच पाहायला मिळाली.

दुसरीकडे प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपाच्या उमेदवार श्रीमती योगिता संजय कुटे यांना ३ मुले असून मुलांचे जन्म तारखेचे दाखले तसेच तीन मुलांसह एकत्र छायाचित्र इत्यादी सर्व पुरावे देऊन सुद्धा, हरकत घेणाऱ्या श्रीमती प्राचीताई कुलकर्णी यांची हरकत फेटाळून लावली व श्रीमती योगिता कुटे अर्ज मान्य करण्यात आला. अधिकारी सुद्धा १०० टक्के फितूर झाले असून, सर्वात दुदैवाची बाब अशी की, भाजपा पक्षाने राज्यातील प्रशासकीय यंत्रणाही भ्रष्ट व लाचार करून टाकली आहे. अधिकाऱ्यांचे अशा पद्धतीने वागणे सर्वतः बेकायदेशीर नियमबाह्य व गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे

धुळेकर नागरिक बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की, धुळे शहरातील गुंडगिरी २०१९ पर्यंत आपण सर्वांनी मिळून मोडून काढली होती. पण २०१९ ला भाजपाने माझा पराभव करण्याकरिता, फारुख शहाला निवडून आणून, जातीय वादाला खतपाणी घातले. तसेच महानगरपालिकेच्या २०१८ च्या निवडणुकीत शहरातील ३२ गुंडांना एकाच वेळेला प्रवेश देऊन सिद्ध करून दिले की, आमच्याकडे कार्यकर्त्यांना किंमत नाही तर, गुंड बदमाशांना किंमत आहे. त्यावेळेला महाराष्ट्रात भाजपाच्या अशा वर्तणुकीविरुद्ध मी एकट्याने बंडखोरी करून, मुदत संपण्यापूर्वीच आमदारकीचा राजीनामा दिला.

आश्चर्य असे की, ज्या निष्ठावंतांसाठी पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध भांडण विकत घेतले. तेच भाजपाला सर्वात आधी शरण गेले. त्यांनी माझ्याशी केलेल्या दगलबाजीची शिक्षा भाजपानेच त्यांना दिली असून, आता त्यांच्यापैकी एकालाही उमेदवारी दिली नाही. लाचारांनो, केवळ झाडझुड करणे, सतरंज्या नसल्याने खुर्च्छा उचलणणष, नेते आले की, गर्दी करणष, टाळ्या वाजवणे, 'की', म्हटले की 'जय' म्हणणे एवढ्या पुरताच तयांचा पक्षाला उपयोग राहीला आहे.

भाजपा हा निष्ठावंतांचा नाही तर, संधीसाधूंचा पक्ष आहे. गुंड, बदमाश, बलात्कारी, नंबर दोनचे धंदे करणारे, काळाबाजार करणारे, सट्टा, मटका यांना प्रतिष्ठा आहे. भाजपाने सिद्ध करून दिले आहे.

मला कळालेल्या माहितीनुसार भाजपाचे काही बंडखोर उभे राहिलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितले आहे की, 'चुकीच्या निर्णयाविरुद्ध बंड करून उठणाऱ्यालाच मर्द म्हणतात.' बंडखोरीस फार मोठे धाडस लागते. सर्व बंडखोरांना माझे आवाहन आहे की, बंडखोरी केली आहे, त्यावर कायम रहा! आणि पक्षाला दाखवून द्या की, खरंच तुमची ताकद आहे! ज्यामुळे भविष्यात तरी तुमची दखल घेतील.

असे आवाहन भाजपाचे माजी आमदार व शिवसेना नेते अनिल अण्णा गोटे, शुभांगी ताई पाटील, भगवान बापूजी करनकाळ, अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील यांनी केले आहे.

प्रभाग क्रमांक १० मधून राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवार काजल माने यांना विजयी करा : बाळकृष्ण लेंगरे मामा

प्रभाग क्रमांक १० मधून राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवार काजल माने यांना विजयी करा : बाळकृष्ण लेंगरे मामा 

कळंबोली : प्रस्थापित पक्षाकडून उपेक्षित समाजातील माणसांना ऐन निवडणुकीत उमेदवारी अर्ज दिले जात नाहीत. तेच ते चेहरे आणि तेच ते उमेदवार याला जनता आता कंटाळली आहे. पनवेल महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने होतकरू नेतृत्वास संधी दिली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या, आपला हक्काचा माणूस म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते असे आनंदा माने सरकार यांच्या पत्नीस राष्ट्रीय समाज पक्षाने संधी दिली आहे. पुरस्कृत उमेदवार अक्षय हाके या उमद्या तरुणास संधी दिली आहे. निवडणुकीच्या माध्यमातून बदल घडवून आणण्याची वाट पाहणाऱ्या मतदारांना, मत शक्तीची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. प्रभाग क्रमांक दहा मधील मतदारांनी काजलताई माने यांच्या रिक्षा या चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करावे, तसेच पुरस्कृत उमेदवार अक्षय हाके यांना खटारा या चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा यांनी केले आहे. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य कोषाध्यक्ष सुदामशेठ जरग, राज्य कार्यकारणी सदस्य भगवान ढेबे, पनवेल महानगर जिल्हाध्यक्ष अरुणशेठ झिमल, शरद दडस, आण्णासाहेब वावरे, सदाशिव जानकर, नितीन शेळके, मच्छिंद्र मोरे, आनंद मोटे, गोरक्षनाथ कोकरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

श्री. लेंगरे मामा पुढे म्हणाले, महानगर म्हणजे काय? महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना ज्या सुविधा पोहचायला पाहिजे, त्या पोहोचताना दिसत नाहीत. पनवेल महानगरपालिका ही मुंबई शहराचे गेट आहे. पनवेल महानगरपालिकेचे बजेट 3 हजार कोटी झालेले आहे, हे पैसे कुठे खर्च करतात हा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे? महागाईमुळे सर्वसामान्य जनता नाराज आहे. बेरोजगारीमुळे सर्वसामान्य कुटुंबातील युवक युवतींना तटपुंज्या पगारावर काम करावे लागत आहे. लोकांचे हक्क आणि अधिकार डावलून लोकशाहीचा गळा घोटन्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. पनवेल महानगरपालिकेत उमेदवारावर दबाव आणून बिनविरोध निवडणूक करून नागरिकांना मताधिकारापासून वंचित ठेवण्याचे पाप, घडले आहे. काजलताई माने व अक्षय हाके यांना लोकशाही भारतात एक बहुमूल्य मत देऊन कळंबोलीतील प्रभाग 10 मधील मतदारांना बदल घडवून आणण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे. मतदार बंधू भगिनींनी येत्या १५ तारखेला बदल घडवून आणावा, असे आवाहन श्री. लेंगरे मामा यांनी केले.

उमेदवार काजल ताई माने म्हणाल्या, कळंबोली शहरातील नागरी समस्या सोडवण्यात सत्ताधारी लोक अपयशी ठरल्यामुळे, प्रभागात बदलाचे वारे वाहत आहे. माझ्या प्रचाराची जबाबदारी जनतेने हातात घेतली आहे. उमेदवार अक्षय हाके म्हणाले, नागरी समस्यांकडे कानाडोळा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनतेने आता उघडे पडले आहे. त्यांच्यावर लोक नाराज असून काजलताई माने व मला लोकांचा पाठिंबा मिळत आहे.

#काजलमाने #आनंदामाने #Kalmboli #प्रभागक्रमांक१० #PanvelMunicipalCorporation #election2026 #pnvelelection2026 #RashtriyaSamajPaksha #mahadevjankar Balkrishna Lengare Mahadev Jankar Official

राष्ट्रीय समाज पक्ष व अखिल भारतीय कोळी समाज तर्फे डॉ. संतोष (डीटी) व राम अवतार कोळी यांचा सत्कार

राष्ट्रीय समाज पक्ष व अखिल भारतीय कोळी समाज तर्फे डॉ. संतोष (डीटी) व राम अवतार कोळी यांचा सत्कार कलबुर्गी : समाजसेवा, संघटना आणि राजकारणाच्य...