गुंडगिरी, पैशांचे अमिष, जीवानिशी ठार मारण्याच्या धमक्या महानगरपालिका निवडणुकीचा भाजपा नवा पायांडा !
- शिवसेना नेते माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांचे खरमरीत पत्र व्हायरल
धुळे : गुंडगिरी, पैशांचे अमिष, जीवानिशी ठार मारण्याच्या धमक्या महानगरपालिका निवडणुकीचा भाजपा नवा पायांडा ! अशा शब्दात माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी पत्रक काढून भावना व्यक्त केल्या आहेत. श्री. गोटे यांनी म्हटले आहे, विरोधकांना कुणी प्रत्यक्ष भेटून, फोन करून, त्यांच्या घरी जाऊन आणि नामचीन गुंड पाठवून, निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दबाव तंत्र. तीन मुले असलेल्या महिलेच्या उमेदवारीवर हरकत घेऊनही, अधिकाऱ्यांनी त्या महिलेचा उमेदवारी अर्ज स्वीकारला. कायदे जणू यांच्या कार्यालयात मंजूर झाले का ? असा सवाल श्री. गोटे यांनी केला आहे.
आता बंड केलेच तर तुमच्या बंडातील ताकदीची पक्षाला ओळख तरी करून द्या! असे आवाहन शिवसेना नेते माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी भाजपच्या बंडखोर तरुण उमेदवारांना केले आहे.
पत्रात श्री. गोटे म्हणतात, महाराष्ट्रभर सर्वच महानगरपालिकांमध्ये जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र भाजपामध्ये नव्या गुंड, बदमाश, बलात्कारी लोकांना घेऊन, भाजपाने महाराष्ट्रातील राजकारण पाकिस्तान, बांगलादेश पेक्षाही खालचे स्तराला नेले. त्यांच्याच पक्षातील महिला, कधीकाळी मंत्री राहिलेल्या नेत्यांच्या कानाखाली जाळ काढत आहेत. तर, निष्ठावंत कार्यकर्ते ढसाढसा रडत आहेत. नव्याने आयात केलेल्या सर्व गुंड बदमाषांना भाजपाने पायघड्या घालून उमेदवारी दिली. पक्षासाठी रात्रंदिवस कष्ट उपसणाऱ्या आणि कठीण परिस्थितीत पक्षासोबत राहिलेल्या, सर्व एकनिष्ठ उमेदवारांना डावलण्यात आले. त्यांना विश्वासात सुद्धा घेतले नाही. अशा धक्कादायक घटना सर्वत्र घडल्या आहेत. कधी नव्हे एवढी गुंडगिरी महापालिका निवडणुकीत दिसून येत आहे. आश्चर्य असे की, सरकार मान्य गुंडगिरी व सरकार पुरस्कृत गुंडगिरी ही पहिल्यांदाच पाहायला मिळाली.
दुसरीकडे प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपाच्या उमेदवार श्रीमती योगिता संजय कुटे यांना ३ मुले असून मुलांचे जन्म तारखेचे दाखले तसेच तीन मुलांसह एकत्र छायाचित्र इत्यादी सर्व पुरावे देऊन सुद्धा, हरकत घेणाऱ्या श्रीमती प्राचीताई कुलकर्णी यांची हरकत फेटाळून लावली व श्रीमती योगिता कुटे अर्ज मान्य करण्यात आला. अधिकारी सुद्धा १०० टक्के फितूर झाले असून, सर्वात दुदैवाची बाब अशी की, भाजपा पक्षाने राज्यातील प्रशासकीय यंत्रणाही भ्रष्ट व लाचार करून टाकली आहे. अधिकाऱ्यांचे अशा पद्धतीने वागणे सर्वतः बेकायदेशीर नियमबाह्य व गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे
धुळेकर नागरिक बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की, धुळे शहरातील गुंडगिरी २०१९ पर्यंत आपण सर्वांनी मिळून मोडून काढली होती. पण २०१९ ला भाजपाने माझा पराभव करण्याकरिता, फारुख शहाला निवडून आणून, जातीय वादाला खतपाणी घातले. तसेच महानगरपालिकेच्या २०१८ च्या निवडणुकीत शहरातील ३२ गुंडांना एकाच वेळेला प्रवेश देऊन सिद्ध करून दिले की, आमच्याकडे कार्यकर्त्यांना किंमत नाही तर, गुंड बदमाशांना किंमत आहे. त्यावेळेला महाराष्ट्रात भाजपाच्या अशा वर्तणुकीविरुद्ध मी एकट्याने बंडखोरी करून, मुदत संपण्यापूर्वीच आमदारकीचा राजीनामा दिला.
आश्चर्य असे की, ज्या निष्ठावंतांसाठी पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध भांडण विकत घेतले. तेच भाजपाला सर्वात आधी शरण गेले. त्यांनी माझ्याशी केलेल्या दगलबाजीची शिक्षा भाजपानेच त्यांना दिली असून, आता त्यांच्यापैकी एकालाही उमेदवारी दिली नाही. लाचारांनो, केवळ झाडझुड करणे, सतरंज्या नसल्याने खुर्च्छा उचलणणष, नेते आले की, गर्दी करणष, टाळ्या वाजवणे, 'की', म्हटले की 'जय' म्हणणे एवढ्या पुरताच तयांचा पक्षाला उपयोग राहीला आहे.
भाजपा हा निष्ठावंतांचा नाही तर, संधीसाधूंचा पक्ष आहे. गुंड, बदमाश, बलात्कारी, नंबर दोनचे धंदे करणारे, काळाबाजार करणारे, सट्टा, मटका यांना प्रतिष्ठा आहे. भाजपाने सिद्ध करून दिले आहे.
मला कळालेल्या माहितीनुसार भाजपाचे काही बंडखोर उभे राहिलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितले आहे की, 'चुकीच्या निर्णयाविरुद्ध बंड करून उठणाऱ्यालाच मर्द म्हणतात.' बंडखोरीस फार मोठे धाडस लागते. सर्व बंडखोरांना माझे आवाहन आहे की, बंडखोरी केली आहे, त्यावर कायम रहा! आणि पक्षाला दाखवून द्या की, खरंच तुमची ताकद आहे! ज्यामुळे भविष्यात तरी तुमची दखल घेतील.
असे आवाहन भाजपाचे माजी आमदार व शिवसेना नेते अनिल अण्णा गोटे, शुभांगी ताई पाटील, भगवान बापूजी करनकाळ, अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील यांनी केले आहे.