Wednesday, November 26, 2025

कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 13 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे रुपेश थोरात व सुषमाताई थोरात मैदानात

कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 13 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे रुपेश थोरात व सुषमाताई थोरात मैदानात 

बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीत एक वेगळे चित्र पाहायला मिळत आहेत. एकाच कुटुंबात भाऊ, बहीण, पती, पत्नी, आई, वडील असे अनेकजन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत घराणेशाहीच्या उमेदवारीबद्दल चर्चा करण्यात येत होती. मात्र निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर सर्वच पक्षात घराणेशाही पहायला मिळत आहे. भाजपकडून ६ जोड्यांना तिकीट देण्यात आले आहे. राष्ट्रीय समाज पक्षानेही कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीत ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रुपेश थोरात व त्यांच्या पत्नी सुषमताई थोरात यांना प्रभाग क्रमांक १३ मधून तिकीट दिले आहे.

आशा प्रतिष्ठान व रासपच्या माध्यमातून थोरात दांपत्याने बदलापूर शहरात केलेल्या सामाजिक राजकीय कामाची दखल मतदार घेतील की नाही, हे आगामी काळात स्पष्ट होईलच. मात्र राष्ट्रीय समाज पक्षाचे शिट्टी या चिन्हावर रुपेश थोरात व सुषमाताई थोरात या आपले निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. त्यांनी प्रचारातही आघाडी घेतली आहे. प्रचारात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग क्रमांक १३ मध्ये लोकांशी असलेला थेट संपर्क यामुळे श्री व सौ. थोरात यांची उमेदवारी भाजप शिवसेनेपुढे प्रबळ ठरत आहे. शेवटच्या टप्प्यात ते निवडणुकीला कसे सामोरे जातात हे पाहावे लागणार आहे.

Sunday, November 23, 2025

बीएमसी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) बरोबर आघाडीसंदर्भात चर्चा, कायदा हातात घेणारे, दडपशाही करणाऱ्यांशी आघाडी नाही – खासदार वर्षा गायकवाड

बीएमसी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) बरोबर आघाडीसंदर्भात चर्चा, कायदा हातात घेणारे, दडपशाही करणाऱ्यांशी आघाडी नाही – खासदार वर्षा गायकवाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांची सिल्व्हर ओकवर चर्चा


महानगरपालिका निवडणुकीत मुंबईकरांना भेडसावणाऱ्या महत्वाचे प्रश्न, बीएमसीतील भ्रष्टाचारावर आवाज उठवणार

मुंबई, दि. १९ नोव्हेंबर ...

मुंबई महानगरपालिका निवडणूक लोकशाही व संविधान माननाऱ्या पक्षांशी आघाडी करुन लढवण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नैसर्गिक आघाडी असून दोन्ही पक्ष लोकशाही व संविधानवादी आहेत. आघाडीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी चर्चा सुरु असून लवकरच त्यासंदर्भातील निर्णय होईल, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांची आज सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या शिष्टमंडळात मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री आमदार अस्लम शेख, आमदार अमीन पटेल, आमदार ज्योती गायकवाड, जिल्हा अध्यक्ष रवि बावकर आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, आजच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी व्हावी अशी काँग्रेसची अपेक्षा आहे, त्यांच्या पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव व इतर नेत्यांशी चर्चा झालेली आहे. लवकरच दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक घेऊन त्यानंतर आघाडीसंदर्भातील निर्णय होईल. 

आघाडीत मनसेच्या सहभागासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसापूर्वीच निवडणुकीत स्वबळावर जाऊ अशी भूमिका मांडली होती. उद्धव व राज ठाकरे दोन भाऊ एकत्र आले तर त्याचे स्वागतच आहे पण त्याबाबत काँग्रेसशी काहीही चर्चा झालेली नाही. काँग्रेसने जेव्हा कोणत्या पक्षाशी आघाडी केली तेव्हा किमान समान कार्यक्रमाच्या आधारे केलेली आहे. बीएमसी निवडणूक समविचारी पक्षांना बरोबर घेऊन लढली पाहिजे असा काँग्रेसचा विचार आहे. मुंबईत देशाच्या सर्व भागातील लोक राहतात, मुंबईच्या विकासात सर्वांचे योगदान आहे. कायदा हातात घेणारे, दडपशाही करणाऱ्यांबरोबर काँग्रेस पक्ष जाऊ शकत नाही. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकाना जोडण्याचे, प्रेम देण्याचे काम केले आहे असे खासदार गायकवाड म्हणाल्या..

महानगरपालिकेची निवडणूक ही मुंबईच्या प्रश्नावर झाली पाहिजे. जात, प्रांत, भाषा आणि धर्म यावर न होता मुंबईकरांचे प्रश्न महत्वाचे आहेत. मुंबईत प्रदुषणाची मोठी समस्या आहे, रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण बीएमसी मधील भ्रष्टाचार हे मुद्दे आहेत त्यावर आवाज उठवला जाईल असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा

वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा

वसई (२०/११/२०२५) : राज्याच्या राजकारणात नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असताना महापालिका निवडणूका तोंडावर येऊन ठेपले आहेत. राज्यात रोज वेगवेगळ्या नवीन राजकीय घडामोडी बघायला मिळत आहेत. आगामी वसई विरार महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात बहुजन विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हितेंद्र ठाकूर- माजी आमदार आण राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा यांच्या नेतृत्वात पालघर जिल्हा राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी यांच्यात बैठक पार पडल्याचे समोर आले आहे. बहुजन विकास आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यात कोणती नवीन राजकीय समीकरणे जुळतात हे पहावे लागेल. 

बैठकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष रामदरश पाल, वासई विरार महापालिका शहर अध्यक्ष नितीन पेंढारी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. वसई - विरार महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Friday, November 21, 2025

मध्यप्रदेशात राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे बिरसा मुंडा जयंती उत्सवाचे आयोजन ; कटनी येथून सुरुवात तर छतरपूर येथे समारोप

मध्यप्रदेशात राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे बिरसा मुंडा जयंती उत्सवाचे आयोजन ; कटनी येथून सुरुवात तर छतरपूर येथे समारोप

रासप नेते एस. एल. अक्कीसागर, बाळकृष्ण लेंगरे मध्य प्रदेश दौऱ्यावर : प्रदेशाध्यक्ष अशोककुमार सिंह यांची माहिती 

मुंबई (२१/११/२०२५)  : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जन जंगलचे रक्षण करून ब्रिटिशांशी दोन हात करून लढणाऱ्या त्यागनायक क्रांतिकारी बिरसा मुंडा जयंती सोहळ्याचे आयोजन मध्यप्रदेश राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आयोजित केले असल्याची माहिती, प्रदेशाध्यक्ष श्री. अशोक कुमार सिंह यांनी यशवंत नायकशी भ्रमध्वनीद्वारे बोलताना दिली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सव राष्ट्रीय समाज बांधवांच्या उपस्थित साजरा करण्यात येत आहे. जयंती सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे (मामा) खास उपस्थित राहणार आहेत.


राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे मध्यप्रदेश राज्यातील लगातार दहा जिल्ह्यात रासपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी कार्यक्रम आयोजित केले आहेत. पहिल्या जयंती कार्यक्रमाची सुरुवात बडबरा कटनी येथून होणार आहे. पुढे उमरिया, शहडोल, अनूपपुर, मैहर, सीधी, सिंगरौली, रीवा, सतना, पन्ना, छतरपुर आदी जिल्ह्यात कार्यक्रम पार पडणार आहे.

Mahadev Jankar Official  Siddappa Akkisagar Balkrishna Lengare बिरसा क्रांती दल जय बिरसा

Thursday, November 6, 2025

रासपतर्फे कुकुडवाड गणातून निवडणूक लढवण्यास अरुणा झिमल इच्छुक

रासपतर्फे कुकुडवाड गणातून निवडणूक लढवण्यास अरुणा झिमल इच्छुक


कुकुडवाड दि. २ (प्रतिनिधी) - कुकुडवाड पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर झाला आहे. कुकडवाडा गटात अत्यंत चुरशीची निवडणुक होईल, असे बोलले जात आहे. राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे कुकुडवाड पंचायत समिती गणातून सौ. अरुणा अरुण झिमल या निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. सौ. झिमल यांच्या रासपमधून निवडणूक लढवण्याच्या दावेदारीने राजकीय समीकरणे बदलतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निष्ठावंताना संधी देणार, असे राष्ट्रीय समाज पक्षाकडून जाहीर केले आहे. अरुण झिमल हे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते मानले जातात. गणातील अनेक गावागावात महादेव जानकर यांचे निष्ठावंत समर्थक मोठ्या संख्येने आहेत. विस्कळीत कार्यकर्त्यांना एकत्र करून मोर्चेबांधणी केल्यास झिमल यांची उमेदवारी भाजप, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटासमोर आव्हान देणारी ठरेल.

पती अरुण झिमल हे सामाजिक, राजकीय कार्यात नेहमीच सक्रिय असतात, त्यांचा मतदारसंघात थेट जनसंपर्क असून, यामुळे आपल्या उमेदवारीस फायदा होईल, असा आशावाद सौ. झिमल यांनी व्यक्त केला आहे. प्रस्थापित पक्षांच्या गोलमाल कारभारास जनता कंटाळली असून, मतदारसंघात गावगाड्याच्या विकासाशी निगडीत पाणी, रस्ता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण या सारख्या गंभीर समस्या आहेत. परंपरागत चालत आलेल्या पशुपालकांच्या चराऊ कुरणावर शासनाने डोळा ठेवून वनविभागाकडे वळवल्या आहेत. पशुपालक, मेंढपाळ यांच्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोलापूरच्या मार्केटमध्ये कुकुडवाड, वडजल, गटेवाडी, विरळी, गंगोती परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला दर मिळाला नाही, याचा रोष शेतकरी वर्गात आहेत. म्हसवड येथे पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत कुकुडवाड पंचायत समिती गणातून आपण उमेदवारीसाठी वरिष्ठांकडे मागणी केली आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाने माझ्या नावाचा विचार करून संधी दिल्यास ताकदीने निवडणुकीला सामोरे जाऊ.



Sunday, November 2, 2025

जगाबाई पुकळे यांचे दुःखद निधन

जगाबाई पुकळे यांचे दुःखद निधन 

जगाबाई महादेव पुकळे यांचे १ नोव्हेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. मात्र आज पहाटे सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती महादेव भाऊ पुकळे, मुलगा अजय पुकळे, मुली कुसुम कटरे (कटरेवाडी), शोभा खरात (गटेवाडी), आशा हुलवान (कार्वे, कराड), संगीता थोरात (गुळेवाडी), रुपाली गोरड (गटेवाडी), सून, नातू, नाती असा मोठा परिवार आहे. मुलगा अजय हा भारतीय सैन्यात देशसेवा बजावत आहेत. आईची तब्येत ठीक नसल्याने ते गावी आले होते. मेंढपाळ जीवन जगणाऱ्या जगाबाई पुकळे या गावात सामाजिक कार्यात सहभागी असायच्या. लग्न कार्यात मांडवाची गीते गाण्यासाठी त्यांचे नाव लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने पुकळेवाडी ग्रामस्थ शोकमग्न झाले. त्यांच्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली. माती सावडण्याचा विधी सोमवारी सकाळी ७:०० वाजता होणार आहे.

राष्ट्रीय समाज पक्ष गुजरात प्रदेश अध्यक्षपदी प्रकाश शाह

राष्ट्रीय समाज पक्ष गुजरात प्रदेशाध्यक्ष पदावर प्रकाश शाह यांची वर्णी 


मुंबई (१/११/२०२५) : गुजरात राज्यात मोठी राजकीय घडामोड पहायला मिळत आहे.  महापालिका, नगरपालिकामध्ये विरोधी पक्षाची भूमिका निभावणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाने नव्या नेतृत्वाला संधी देत मोठा डाव टाकलाय. गुजरात रासप संघटनेबद्दल ऑनलाइन मीटिंग आयोजित करण्यात आली होती. गुजरात राज्याचे राष्ट्रीय प्रभारी श्री. के. प्रसन्नाकुमार यांचे नेतृत्वात ही मीटिंग पार पाडली. या मीटिंगमध्ये रासपाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांना निमंत्रित करण्यात आले होते. या मीटिंगमध्ये गुजरात राज्य रासपा अध्यक्षपदी प्रकाश शाह यांची निवड करण्यात आली. या मीटिंगमध्ये गुजरात रासप प्रभारी सुशील शर्मा, किरण सोलंकी व अन्य गुजरात रासपचे पदाधिकारी उपस्थित होते, मात्र निमंत्रित राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, गुजरात रासपचे माजी महासचिव एड. संजय वाघमोडे मिटिंगमध्ये उपस्थित राहू शकले नाहीत. राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकाऱ्यांना भाजप आपल्या गोटात ओढत असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाने गुजरात प्रदेश अध्यक्षपदी प्रकाश शाह यांची नियुक्ती केली आहे. श्री. शाह यांची नियुक्ती केल्याचे गुजरात प्रभारी सुशील शर्मा यांनी जाहीर केले आहे, तसे त्यांनी रासपचे मुखपत्र 'विश्वाचा यशवंत नायक'ला कळले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. अहमदाबादचे रहिवाशी प्रकाशभाई शाह नव्या उमेदीने राष्ट्रीय समाज पक्षाचे काम दमदारपणे करतील, असा विश्वास गुजरात रासपचे पदाधिकारी महेंद्र राठोड यांना वाटतो. त्यांच्या निवडीबद्दल रासपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, संस्थापक सदस्य एस. एल अक्कीसागर, राष्ट्रीय महासचिव के प्रसन्नाकुमार यांनी अभिनंदन केले आहे.

मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही; शेतकरी महाएल्गार आंदोलनात महादेव जानकर कडाडले

मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही; शेतकरी महाएल्गार आंदोलनात महादेव जानकर कडाडले


नागपूर (२९/१०/२५) : शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याच्या मागणीवरुन प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून विविध शेतकरी नेते या आंदोलनात सहभागी होत नागपूरला पोहोचले आहेत. नागपूर येथील मेळाव्यातून नेत्यांची आक्रमक भाषणे सुरू हेत. साले तुम्ही डरपोक, कोर्टाला समोर करता, नामर्दाची औलाद आहे. जेल कमी पडेल, आम्हा अटक करा, अशा शब्दात बच्चू कडू यांनी आपली भूमिका मांडली. तर, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली आहे, पण शेवट आम्ही करू. सरकार बदलल्याशिवाय देवेंद्र, आम्ही तुला शांत बसू देणार नाही. सरकारच्या माध्यमातून, कोर्टाच्या माध्यमातून तुम्ही डाव टाकताय. मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असे म्हणत राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी महायुती सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. आय एम कोर्ट, वुई आर कोर्ट, जनता ही कोर्ट आहे. जोपर्यंत हे नेते सांगत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन थांबवलं जाणार नाही. पोलिसांनी आमच्या माणसांना तुम्ही घेऊन जावा, सरकार हरतंय का आम्ही हरतोय हेच आम्हाला बघायचं आहे, असेही महादेव जानकर यांनी नागपुरातील एल्गार मेळाव्यातून बोलताना म्हटले.

माझी मुले तिथे शिकतात. कोकरे महाराज व गुरुकुलला बदनाम करण्याचे षडयंत्र; लवकरच सत्य समोर येईल - मारुती जानकर

माझी मुले तिथे शिकतात. कोकरे महाराज व गुरुकुलला बदनाम करण्याचे षडयंत्र; लवकरच सत्य समोर येईल - मारुती जानकर


लवकरच पोलिस अधीक्षक व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देणार

मुंबई (१६/१०/२५) : संत ज्ञानेश्वर जीवन मुक्ती धाम सेवा संस्था लोटे परशुराम या गुरुकुल मध्ये भगवान कोकरे महाराज यांच्यावर झालेले आरोप चुकीचे असल्याचे सांगत शिवसेना नेते मारुती जानकर यांनी समाज माध्यमात पोस्ट लिहून लवकरच सत्य बाहेर येईल असे म्हटले आहे. योग्य तपास करून महाराजांना निर्दोष करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेणाऱ्या गरीब कुटुंबातील गरजू मुलांचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचवावे असे आवाहन त्यांनी पोलिसांना केले आहे.  महाराजांवर खोटा गुन्हा दाखल करायला लावण्यापाठीमागे षडयंत्र करणाऱ्या सर्वांना उघड करावे, असे त्यांनी म्हटले आहे.


समाज माध्यमात सातारचे शिवसेना नेते मारुती जानकर यांनी लिहिली पोस्टमध्ये पुढील प्रमाणे म्हटले आहे, नमस्कार मी मारुती जानकर ह्यूमन राइट संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तसेच शिवसेना शिंदे गटाचा एक पदाधिकारी म्हणून जबाबदारीने सांगू इच्छितो लोटे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील संत ज्ञानेश्वर जीवन मुक्ती धाम सेवा संस्था लोटे परशुराम या गुरुकुल मध्ये भगवान कोकरे महाराज यांच्यावर विनयभंगाचे झालेले आरोप या घटनेबाबत माझ्यासमोर आलेली सत्य बाजू मांडत आहे. माझा या गुरुकुलशी असलेल्या संबंध म्हणजे या गुरुकुल मध्ये माझा ही मुलगा शिक्षण घेत आहे. त्याचप्रमाणे माझी बहीण त्या गुरुकुल मध्ये मुलांच्या देखभालीचे काम करीत असून, त्यामुळे घडलेल्या घटने मागचे खरे वास्तव तुमच्यासमोर मांडत असून या गुरुकुल मध्ये फिर्यादी मुलगी व तिची चार भावंडे शिक्षण घेत होती. त्यामध्ये तीन मुली व दोन मुलगे त्या मध्ये एक 22 वर्षाचा मुलगा होता .तो मुलगा गुरुकुल मधील लहान मुलांबरोबर अश्लील कृत्य करून त्यांचे नग्न फोटो काढत असे तसेच त्याला सिगारेट ओढण्याचे देखील व्यसन होते. त्याने गुरुकुल मधील एका मुलीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न देखील केला होता . या सगळ्या त्याच्या कृत्याविषयी गुरुकुल एक प्रमुख व्यक्ती म्हणून भगवान महाराजांनी त्याला अनेक वेळा समज दिली होती.परंतु त्याच्या कृत्यामध्ये काही फरक पडला नव्हता. त्यामुळे दुसरा पर्याय नसल्याने त्याच्याविरोधात पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गुरुकुल मधील काही कर्मचारी व स्वतः भगवान महाराज पोलीस स्टेशनला गेले होते. परंतु त्यावेळी पोलिसांनी ती तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. ( ही तक्रार न्यायालयाच्या माध्यमातून न्यायालयात दाखल करण्यात येणार असून त्यामुळे या घटनेचे देखील सत्य न्यायालयासमोर येईल ) यानंतर भगवान महाराज व गुरुकुल मधील जबाबदार व्यक्तींनी त्या मुलाला गुरुकुल मधून काढून टाकले. या प्रकरणानंतर या मुलाला हाताशी धरून संस्थेच्या काही माजी पदाधिकारी यांनी संस्थेमध्ये गोंधळ घातला होता. या माजी पदाधिकाऱ्यांनी संस्थेमध्ये केलेल्या कृत्याबद्दल लोटे पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी संस्थेतील जबाबदार पदाधिकारी गेले असता त्यावेळी देखील पोलिसांनी त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. हा सर्व प्रकार तेथील काही राजकीय पुढार्‍यांना समजल्यानंतर अगोदरच भगवान कोकरे महाराज यांच्या विरोधात असलेल्या पुढाऱ्यानी या घटनेचा फायदा घ्यायचा व गुरुकुल ला बदनाम करायचे म्हणून फिर्यादी मुलीला व त्यांच्या कुटुंबीयांना हाताशी धरून कोकरे महाराजांच्या विरोधात खोटी फिर्याद दिली असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. दिलेल्या फिर्यादीचे सत्य हे न्यायालयासमोर येईलच याबद्दल काही शंका नाही. परंतु हे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी व माजी पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केलेल्या कृत्यामुळे गुरुकुल मध्ये इतर निराधार व गरीब कुटुंबातील शिकत असलेल्या मुलांच्यावर मात्र खूप वाईट व गंभीर परिणाम होत आहेत.

पोलीस प्रशासनाने कोणताही दबाव न घेता निष्पक्षपणे तपास केल्यास या प्रकरणातील सत्य सर्वांना समजू शकते. त्या पद्धतीने योग्य तपास करून महाराजांना निर्दोष करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेणाऱ्या गरीब कुटुंबातील गरजू मुलांचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचवावे असे आवाहन आम्ही पोलिसांना करत आहे. तसेच महाराजांवर खोटा गुन्हा दाखल करायला लावण्या पाठीमागे षडयंत्र करणाऱ्या सर्वांना उघड करावे. याबाबत लवकरच पोलिस अधीक्षक व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे.

माण तालुका बाजार समितीच्या सत्ता संघर्षात ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरेंचा दणका; सभापतिपदी ब्रम्हदेव पुकळे यांची निवड

माण तालुका बाजार समितीच्या सत्ता संघर्षात ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरेंचा दणका; सभापतिपदी ब्रम्हदेव पुकळे यांची निवड 










दहिवडी : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडीची बैठक कोरमअभावी तहकूब करण्यात आली होती. जयकुमार गोरे यांच्या भाजप व महादेव जानकर यांच्या रासपची माण बाजार समिती निवडणूकित युती झाली होती. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादिला सत्तेपासून दूर ठेवण्यात आ. जयकुमार गोरे यांनी यश मिळवले होते. जयकुमार गोरे व महादेव जानकर यांच्या रासपमध्ये विधानसभा निवडणुकीत अंतर वाढत गेले. बदलत्या राजकीय समीकरणांचा विचार करून जयकुमार गोरे यांनी रासपच्या आप्पासाहेब पुकळे यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अध्यक्षपद देऊन आपल्याकडे खेचून घेतले. म्हसवड नगरपालिका व तालुक्यात प्रभाव असलेल्या आप्पासाहेब पुकळे यांनी जयकुमार गोरेंचा दणदणीत विजय विधानसभा निवडणुकीत सुकर करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. बाजार समिती सभापती निवडणुकीत रासपचे तीन सदस्य भाजपच्या गटाकडे गेले तर एक सदस्य राष्ट्रवादीच्या गटाकडे गेला. सभापती पदाची बैठक वादळी ठरल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु न्यायालयाने निर्णय फेटाळून लावत राष्ट्रवादी पक्षाला झटका दिला. 

अखेर आज नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी बाजार समितीच्या सत्ता संघर्षात दणका देत आपला दबदबा पुन्हा सिद्ध केला आहे. भाजपच्या गटाकडे 9 तर राष्ट्रवादी गटाकडे 8 सदस्य उपस्थित राहिल्याने भाजपची सरशी झाली. मंत्री गोरेंना किंगमेकर आप्पासाहेब पुकळे यांची साथ लाभली. ब्रम्हदेव पुकळे यांना सभापती पदावर निवड करून तालुक्यावर एका उमद्या नेतृत्वास संधी दिली आहे. श्री. पुकळे यांची निवड होताच मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांच्यासह माण तालुक्यातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले. पुकळेवाडी ग्रामस्थ यांनी हलगीच्या निनादात जेसीबीतून फुले उधळत ब्रम्हदेव पुकळे यांची जल्लोषात स्वागत मिरवणूक काढली. एक सर्वसामान्य मेंढपाळ कुटुंबातील शेतकरी नेतृत्वाला सभापती पदी संधी दिल्याने सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्या भाजप कार्यकर्त्यांनी सभापती निवडीचे फटाके वाजवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पायाभरणीचे काम केले. ब्रम्हदेव पुकळे यांच्या निवडीने कुकुडवाड जिल्हा परिषद गटात भाजपची ताकद वाढली आहे. 

ब्रह्मदेव पुकळे यांचा राजकीय प्रवास 

ग्रामपंचात सदस्य, सरपंच, उपसरपंच ते सभापती. ब्रम्हदेव पुकळे यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. सर्वसामान्य झटणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.

घेरडीत शेतकऱ्याचा आसूड मेळावा

घेरडीत शेतकऱ्याचा आसूड मेळावा 

(२५/१०/२५) : शेतकरी, शेतमजूर, कामगार, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळ बांधवांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी घेरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर शेतकऱ्यांचा असूड मेळावा हजारोंच्या उपस्थित संपन्न झाला.




















बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे ५ उमेदवार रिंगणात

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे ५ उमेदवार रिंगणात 

मुंबई  : २०२५ सार्वत्रिक बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष मैदानात उतरलाय. रासपचे ५ निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. कोणतीही युती आघाडी न करता राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी देखील मधुबनी जिल्ह्याचा दौरा करून जाहीर सभा घेतली होती. बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा यांची खास नेमणूक केली आहे. श्री. लेंगरे मामा यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर बिहार विधानसभा निवडणूक जबाबदारी रासपने सोपवली आहे. सध्या ते बिहारमध्ये दाखल असून, प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. यापूर्वी श्री. लेंगरे मामा यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या समवेत बिहारमध्ये दौरे केले आहेत.

बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होत आहे. सहरसा विधानसभा क्षेत्रात रासपने युवा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. २७ वर्षीय बिट्टू कुमार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून रासपतर्फे आव्हान दिले आहे. प्रचारही चालू केला आहे. बिहार विधानसभेसाठी एकूण 243 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. ३१ हरलाखी विधानसभा क्षेत्रातून शिवलाल पासवान,५३ ठाकूरगंज विधानसभा क्षेत्रात रासपचे पुरस्कृत उमेदवार मोहम्मद मुक्तार, ७५ सहरसा विधानसभा क्षेत्रात बिट्टू कुमार, ६२ पूर्णिया विधानसभा मतदार क्षेत्रात अजय स्वर्ण, कैलास शर्मा निवडणूक लढवत आहेत. रासप उमेदवारांना चहाची किटली हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. बिहारच्या राजकारणात राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य प्रभारी गोपाल पाठक, प्रदेश अध्यक्ष चित्तरंजन गिरी, महासचिव रोहित शर्मा सक्रिय असतात. राष्ट्रीय समाज पक्षामुळे बिहारच्या  निवडणूकीमुळे काय राजकीय परिणाम होतो हे लवकरच स्पष्ट होईल.

भल्या भल्याचं सरकार उलटी केली आहेत, यांचं पण उलटायला वेळ लागणार नाही; महादेव जानकर यांचा सरकारवर घणाघात

भल्या भल्याचं सरकार उलटी केली आहेत, यांचं पण उलटायला वेळ लागणार नाही; महादेव जानकर यांचा सरकारवर घणाघात

बारामती (१२/१०/२५) : रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी इंदापूर तालुक्यातील एलगार मेळाव्यात सरकारचा चांगलाच समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून राजकीय स्थैर्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी सडेतोड भूमिका घेतली. “भल्या भल्याचं सरकार आम्ही उलथावली आहेत. हे सरकार उलथवायला पण जास्त वेळ लागणार नाही,” असा इशारा त्यांनी सध्याच्या सरकारला दिला आहे. यावेळी जानकर पुढे म्हणाले, “23 किंवा 24 तारखेला सांगोल्यात आम्ही एक मोठी परिषद आयोजित केली आहे. या परिषदेसाठी तीस ते पस्तीस हजार लोकांचा जमाव अपेक्षित आहे. त्यासाठी आमचा सगळा बंदोबस्त सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार आणि रासप या तिन्ही संघटना एकत्र येऊन ताकद दाखवण्याचं काम करणार आहे. माणसं कमी असली तरी आमची ताकद कमी नाही. आम्ही पाच माणसांनी सरकार बदलली आहेत. त्यामुळं काळजी करण्याचं काही कारण नाही. आम्ही शनिवारी चंद्रपूर, नागपूर इथून रात्री प्रवास करून आलोय. आम्ही खचून जाणारे नाही, लढत राहणारे आहोत.”

जानकर यांनी सरकारच्या शेतकरी धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “शेतकऱ्यांच्या नावावर मतं घेऊन हे सरकार सत्तेवर आलं. पण शेतकऱ्यांना दिलासा नाही. विधानसभेत मुख्यमंत्री मोठमोठी भाषणं देतात, ‘शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू’ असं म्हणतात. पण कोणी विचारावं, खरंच सातबारा कोरा झाला का?” सोयाबीनच्या एका एकरावर 22 हजार खर्च येतो आणि सरकार म्हणतं आम्ही साडेआठ हजार रुपये देतो. नदीकाठची जमीन वाहून गेली तर सहा लाखांचा खर्च येतो, पण सरकार फक्त 47 हजार रुपये देते. असं करून शेतकऱ्यांना न्याय मिळतो का? पश्चिम महाराष्ट्रातील नेते मोठे झाले आणि शेतकरी भिकारी झाले आहेत.”

सरकारने सर्वांना समान न्याय द्यायची भूमिका करावी : महादेव जानकर

सरकारने सर्वांना समान न्याय द्यायची भूमिका करावी : महादेव जानकर 

चंद्रपूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाची संवाद बैठक पार 

चंद्रपूर (११/१०/२५) : सरकारने सर्वांना समान न्याय द्यायची भूमिका करावी, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. श्री. जानकर हे चंद्रपूर येथे पत्रकाराशी बोलत होते. चंद्रपूर दौऱ्यावर आलेल्या महादेव जानकर यांनी स्व. गणपतराव देशमुख यांच्या घरावरील झालेल्या घटनेचा जाहीर निषेध केला.  

श्री. जानकर पुढे म्हणाले, देशातील कोणताही समाज असू द्या, त्या समाजाला समान न्यायाची भूमिका घेतली पाहिजे, परंतु तसं घडत नाही. जिसकी जितनी संख्या उनकी उतनी भागीदारी ही शासन, प्रशासन, न्यायपालिका सर्वत्र मिळाली पाहिजे. सामाजिक आरक्षण आणि आर्थिक मुक्ती हा अजेंडा पाहिजे. परंतु राज्य सरकार तसे करत नाही. गरीब गरीब होत चाललाय आणि श्रीमंत श्रीमंतच होत चाललाय. दोन जातीत, दोन धर्मात कलह निर्माण करण्याचे काम सरकार करत आहे. ओबीसी विरुद्ध मराठा, ओबीसीतून बंजारा, धनगर वेगळे करायचे हे बरोबर नाही. कधी हिंदूच कार्ड खेळायचं कधी मुसलमानच कार्ड खेळायचं, हे समतेसाठी योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहूजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श असणारा महाराष्ट्र राज्य आहे. 

पत्रकार परिषदेपूर्वी, राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मा.मंत्री रा महादेवराव जानकर यांच्या उपस्थितीत पत्रकार भवन, वरोरा नाका चंद्रपुर येथे राष्ट्रीय समाज पक्षाची संवाद बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. तौसिफ शेख, प्रदेश सचिव संजय कन्नावार, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आनंदराव अंगलवार, महिला अध्यक्षा वंदनाताई गेडाम, नवनियुक्त  युवक  जिल्हाध्यक्ष साबीर जफर शेख आदी उपस्थित होते.

लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी सर्व समाजासाठी दसरा मेळावा सुरू केला : महादेव जानकर

लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी सर्व समाजासाठी दसरा मेळावा सुरू केला : महादेव जानकर 

बीड (२/१०/२५) : लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी सर्व समाजासाठी दसरा मेळावा समतेसाठी सुरू केलता, तीच परंपरा जिवंत ठेवण्याचे काम राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे करत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. मंत्री पंकजा मुंडे यांनी श्री भगवानबाबा भक्तीगड सावरगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात महादेव जानकर बोलत होते. मंचावर माजी खासदार प्रीतम मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे, मोनिका राजळे, माजी आमदार भीमराव धोंडे व अन्य उपस्थित होते.

श्री. जानकर पुढे म्हणाले, पंकजाताईने सुरु केलेल्या हा समतेचा रथ पुढे नेण्यासाठी, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची भूमिका बहिण पंकजाताई मुंडे करत आहे, तिचे हात बळकट करण्यासाठी आयुष्यभर या मेळाव्याला येत राहणार आहे. भाषणादरम्यान गोपीनाथ मुंडेचा फोटो असलेला झेंडा महादेव जानकर यांनी फडकावला तर पंकजाताईच्या मुलाचा आमचे जावई आर्यमन पालवे असा उल्लेख केला.

रासपच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांची भेट घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी

रासपच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांची भेट घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी




मुंबई (७/१०/२५) : मंत्रालय येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या शिष्टमंडळाच्यावतीने भेट घेऊन महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी ₹५०,०००/- मदत, सातबारा कोरा करणे व पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना तात्काळ मदत देणेबाबत निवेदनाद्वारे मागणी केली. शिष्टमंडळात राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्यमहासचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. तोसिफ शेख, राज्य सरचिटणीस अजित पाटील उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली रासपच्या पदाधिकाऱ्यांनी यवतमाळ, अकोला, बुलढाणा, अमरावती, नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम, बीड, धाराशिव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर तसेच अनेक जिल्ह्यांतील दौरा करून पूरग्रस्त भागांची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळले.


राज्याच्या उपमुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे रासपने पुढीलप्रमाणे मागण्या केल्या आहेत. १ ) ज्या कुटुंबांची कायमची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत त्यांना १० लाख रुपये आणि ज्यांची कच्ची घरे खराब झाली आहेत त्यांना ५ लाख रुपये भरपाई मिळावी. २) पुरामुळे शेतकऱ्यांना झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई कोणत्याही पंचनामा किंवा इतर औपचारिकतेशिवाय, त्यांच्या शेतजमिनीच्या आकारानुसार प्रति एकर ५०,००० रुपये या दराने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावी. ३) पुरात वाहून गेलेल्या घरगुती वस्तूंची यादी, जसे की रेशन, गॅस स्टोव्ह, कपाट, टीव्ही, रेफ्रिजरेटर, कूलर, सोफा सेट, संगणक, वाहने, किराणा सामान आणि इतर वस्तूंची यादी तयार करावी आणि योग्य भरपाई द्यावी. ४) शाळेत जाणाऱ्या मुलांना मोफत शालेय शुल्क, नोटबुक, गणवेश आणि बॅग्ज देण्यात याव्यात, जेणेकरून त्यांचे शिक्षण खंडित होऊ नये. ५) पुराच्या पाण्याने पशुधन गाई, म्हैसी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडल्याने त्यांना बाजारभावाप्रमाणे मोबदला देण्यात यावा आणि ५ फूट पर्यंतची सुपीक माती वाहून गेली आहे. सर्वेक्षण करून योग्य भरपाई द्यावी. ६) पूरग्रस्त कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून दीर्घकालीन पुनर्वसन योजना विकसित करावी. ७) बँकेने व फायनान्स कंपनीने वाहन कर्ज व इतर कर्जाची सक्तीची वसुली करू नये. ८) छोट्या व्यापाऱ्यांचे जे नुकसान झाले आहे, त्यांना  

विशेष निधी देण्यात यावा. या भयानक पूरपरिस्थितीत राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या पुनर्वसनासाठी तात्काळ व प्रभावी निर्णय घेऊन मदत पोहचवावी, असे राज्य सरकारला आवाहन केले आहे. लवकरच मदत जाहीर करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Saturday, November 1, 2025

ओबीसी समाज हाच राष्ट्रीय समाज - अक्कीसागर

 ओबीसी समाज हाच राष्ट्रीय समाज - अक्कीसागर





विजयवाडा (१२/१०/२०२५) : ओबीसी समाज हा राष्ट्रीय समाज आहे, असे प्रतिपादन एस. एल. अक्कीसागर यांनी केले. साऊथ इंडिया ओबीसी सेमिनार कार्यक्रमात रासपचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष तथा रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर बोलत होते. यावेळी गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलचे एन. बी. हरिश, राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक गोविंदराव शुरनर, आंध्र प्रदेश कुरबा कुरमा कुरवा समाज संघाचे अध्यक्ष जब्बाला श्रीनीवासूलू, अर्जुनराव, माजी खासदार सागर रायका, रासेफचे मदनेश्वर शुरनर, तेलंगणा रासपचे प्रभारी रमाकांत करगतला व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.

श्री. अक्कीसागर भाषणात म्हणाले, आज मी विजयवाडा येथे आलो आहे. हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. मी महाराष्ट्र व कर्नाटकात राहतो. आंध्र प्रदेश कुरवा कुरबा कुरमा समाज संघाच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त साऊथ इंडिया ओबीसी सेमिनार होत आहे, हे पाहून खूप आनंद होत आहे. काल मी हैदराबाद येथे होतो. अमिस्तापूर (जिल्हा मेहबूबनगर, तेलंगणा) गावात स्व. नरसप्पा नरसिंहा नावाचे पहिले आमदार होते. स्व. मलाप्पा कोलूर कर्नाटकात आमदार होते. कर्नाटक व आंध्रप्रदेश मध्ये दोन कुरबा आमदार झाले, त्याठिकाणी भेट दिली. आज राज्यसभेत आंध्र प्रदेशचे दोन खासदार आहेत, त्यांना मी नमस्कार करतो. 

श्री. अक्कीसागर पुढे म्हणाले, मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आहे, 2011 मध्ये ईशान्य भारतात ओबीसींचा कार्यक्रम घेतला. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचा प्रतिनिधी म्हणून मी येथे आलो आहे, अक्कीसागर म्हणून मी येथे आलेलो नाही. भारतात शेफर्ड, गडरिया मधुन कोणाची स्वतःची पार्टी आहे का? त्यांची स्वतःची राजकीय पार्टी आहे, ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा २२ वा वर्धापनदिन साजरा केला. महादेव जानकर बोलतात, बहुसंख्याक ओबीसी लोकांची मते घेऊन, अल्पसंख्याक लोक देशावर राज करतात आणि ओबीसी समाज त्यांच्याकडे भीक मागतात. ओबीसी समाज हा राष्ट्रीय समाज आहे. तमिळनाडू पासून काश्मीर पर्यंत ते कच्छ पासून बंगाल पर्यंत सर्वांना विश्वास देण्याचे काम महादेव जानकर करत आहेत. देशाla स्वराज्य आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी १८३१ मध्ये क्रांतीवीर संगोळी रायन्ना फासावर गेले. २००८ मध्ये त्यांचा शाहिददीन, पुण्यतिथी दिवस न करता महादेव जानकर यांनी नंदगड बेळगाव कर्नाटक येथे राज्याभिषेक केला. 26 जानेवारी रोजी गेली 18 वर्षे राज्याभिषक वार्षिकउत्सव साजरा केला जात आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक उमेदवार

राष्ट्रीय  समाज पक्षाचे नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक उमेदवार  मुंबई : नगरपालिका व नगरपंचायात निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र रा...